तरुण भारत

लॉकडाऊनमुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीत

बाजारपेठा बंद, विक्रीचा प्रश्न, उत्पादनातही घट

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

  यंदा सुरूवातीपासून काजू लागवडीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट झाली आहे. त्यातच आता कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याने काजूची विक्री कोठे करावी, असा प्रश्न काजू उत्पादक शेतकऱयांसमोर आहे. काजू विक्री हंगामाच्या तोंडावर कोरोनाचे संकट ओढविल्याने काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आधीच यंदा काजू उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच आता विक्रीचाही प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे.

  तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, उचगांव, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, कल्लेहोळ, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते आदी भागात काजूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. दरवषी  बेळगुंदी व तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत काजूची विक्री केली जाते. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर कडक बंदोबस्त आहे. त्यामुळे काजू मालाची कोठे विक्री करावी, या चिंतेत शेतकरी आहेत.

 काजूकडे कमी श्रमात चांगले उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते.  साधारण मार्च महिन्यानंतर काजू लागवडीला प्रारंभ होतो. मागील दोन वर्षापूर्वी काजूला साधारण 150 ते 160 रुपये प्रति किलो दर मिळाला होता. मात्र यंदा केवळ 90 ते 100 रुपये दर असल्याचे उत्पादकातून बोलले जात आहे. मागील चार- पाच वर्षात काजूला समाधानकारक दरही मिळाला होता. गतवर्षापासून काजू विक्रीच्या हंगामात कोरोनामुळे बाजारपेठा बंद राहत असल्याने उत्पादक आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहेत. अलिकडच्या काही वर्षात काजू बाग तयार करण्याकडे शेतकऱयांचा ओढा वाढला आहे. साहजिकच काजूचे क्षेत्रही देखील वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. मात्र कोरोनामुळे बाजार बंद असल्याने व व्यापार देखील थंड असल्याने काजूचे काय करावे या चिंतेत उत्पादक आहेत.

Related Stories

शरीर सुदृढ राहण्यासाठी जिम्स्ना परवानगी द्या

Patil_p

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांकडून वानराला जीवदान

Amit Kulkarni

खादीमीन एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीतर्फे रक्तदान शिबिर

Patil_p

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळय़ात

Patil_p

स्वॅब तपासणीची क्षमता वाढविण्याचा निर्णय

Amit Kulkarni

म.ए.समितीच्या उमेदवारांनाच विजयी करा

Patil_p
error: Content is protected !!