तरुण भारत

सांगा, भाजीपाला विकायचा कुठे?

भाजीपाला उत्पादकांसमोर प्रश्न, आठवडी बाजारपेठा बंद

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठांवर मर्यादा आल्या आहेत. एपीएमसी भाजीमार्केट बंद आहे. तर तालुक्मयातील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला विकायचा कुठे? असा प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱयांसमोर पडला आहे. दरम्यान भाजीपाल्यांचे दर देखील गडगडल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहेत.

तालुक्मयातील बेळगुंदी, मुतगा, सांबरा, पिरनवाडी, बाळेकुंद्री, बागेवाडी, सुळेभावी आदी ठिकाणी आठवडी बाजार भरतो. याठिकाणी मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्यांची विक्री होते. मात्र लॉकडाऊनमुळे या सर्व बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी भाजीमार्केट बंद करून शहरातील तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित भाजीमार्केटची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी सकाळी 6 ते 10 यावेळेत परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी अपुऱया वेळेमुळे घाईगडबडीतच भाजीपाल्यांची खरेदी-विक्री करावी लागत आहे. दरम्यान वेळेअभावी भाजीपाला पडून असलेला पहायला मिळत आहे. कोरोनाच्या धास्तीने व्यापारी, खरेदीदार व उत्पादकही स्थलांतरित भाजीमार्केटला येण्यास घाबरत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची खरेदी-विक्री थंडावलेली पहायला मिळत आहे. परिणामी शिवारात भाजीपाला पडून असलेला दिसून येत आहे.

तालुक्मयातील कडोली, जाफरवाडी, आंबेवाडी, मण्णूर, बेळगुंदी, उचगाव, केदनूर, मण्णीकेरी, सुळगा, होनगा, काकती, कंग्राळी बुदुक, बेळवट्टी, सोनोली, राकसकोप, कुदेमनी, तुरमुरी, बाची, बस्तवाड, धामणे, झाडशहापूर, मच्छे आदी भागात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला आहे. मात्र लॉकडाऊनचा सर्वच भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे. तालुक्मयातील शिवारात टोमॅटो, ओली मिरची, कोबी, फ्लॉवर, कारली, वांगी, दोडकी, काकडी, गाजर, आदी भाजीपाला बहरात आहे. मात्र सर्वच भाजीपाला विक्रीविना शिवारात पडून आहे. शिवाय भाजीपाल्यांचे भाव देखील कमी झाल्याने भाजीपाला फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भाजीपाला शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या ढगाळ वातावरण व अधून-मधून पाऊस होत असल्याने भाजीपाल्यांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्यांची विक्री थांबल्याने उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे.

कोरोनाला हरविण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱयांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. परिणामी किरकोळ भाजीपाला विकणे देखील बंद पडले आहे. रविवारपेठ मधील  भाजीमार्केट बंद असल्याने भाजीपाल्यांची मागणी थंडावली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बाजारपेठेवर परिणाम झाला असून दरही गडगडले आहेत.

चौकट  लॉकडाऊनमुळे खर्च केलेले लाखो रुपये वाया

 अलिकडच्या काही वर्षात तालुक्मयात आधुनिक पद्धतीने ओल्या मिरचीची लागवड करण्यात येत आहे. यासाठी प्लास्टिक कागदाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. व ठिंबकद्वारे पाणी दिले जाते. त्यामुळे खर्च मोठय़ा प्रमाणात येतो. s तालुक्मयात यंदा प्लास्टिक आच्छादन करून मिरचीची लागवड केलेल्या शेतकऱयांची संख्या अधिक आहे. याकरिता लाखो रुपये शेतकऱयांनी खर्च केले आहेत. मात्र मिरची काढणीला आली असतानाच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले आहेत.

Related Stories

श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये पालक मेळावा

Omkar B

कल्लेहोळ येथील रेशन वितरण सुरळीत करा

Patil_p

चमुकल्याने तयार केली तोरणागडाची प्रतिकृती

Patil_p

सांस्कृतिक-मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची मुभा द्या

Patil_p

लोकमान्यतर्फे गणेशभक्तांना आरती ऍपची भेट

Patil_p

होनगा येथे शिवछत्रपतींचा पुतळा भूमिपूजन कार्यक्रम

Patil_p
error: Content is protected !!