तरुण भारत

सोलापूरसाठी १३१८ रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी 1318 रेमडीसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले असून शहर जिल्ह्यातील कोविड केअर, मेडीकल यांना प्राधान्याने वितरीत करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. तर दुसरीकडे ऑक्सीजन, बेड आणि रेमडेसिवीरची कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी 1318 इंजेक्शन प्राप्त झाल्याची माहिती शंभरकर यांनी दिली आहे.

शहरात 567, बार्शी तालुकासाठी 156 दक्षिण सोलापूरसाठी 29 , पंढरपुरसाठी 210, सांगोला 58, मंगळवेढा 40, माळशिरस 146, करमाळा 33, माढा 8, अक्कलकोट चार, अशा एकूण 1318 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. या इंजेक्शनचा उपयोग कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी करायचा आहे. या इंजेक्शनचे वितरण ठरल्याप्रमाणे करायचे आहे, यात कसली गडबड खपवून घेतली जाणार नसल्याचे शंभरकर यांनी सांगितले.

Related Stories

बार्शी तालुक्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू ; नवीन तीन रुग्णांची भर

triratna

पेट्रोल दरवाढी विरोधात आम आदमीच्यावतीने निदर्शने

triratna

सोलापूर शहरात 20 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, दोघांचा मृत्यू

triratna

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ बंद

triratna

अहिल्यादेवी, बसवेश्वर, अण्णाभाऊंचे अध्यासन सुरु करणार : उदय सामंत

Shankar_P

अवैध धंदेवाल्याशी पोलीसांनी सहभाग ठेवल्यास कारवाई – पोलीस अधीक्षक

Shankar_P
error: Content is protected !!