तरुण भारत

कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाखाहून अधिक

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात शनिवारी कोरोना संसर्गाची सक्रिय प्रकरणे सहा लाखांच्या पुढे गेली. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ४१ हजाराच्या वर गेली. राज्यातील विविध जिल्ह्यात शनिवारी ४१,६६४ रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ६,०५,४९४ वर पोहोचली आहे. त्याच वेळी, राज्यात कोरोना संक्रमणामुळे ३४९ लोकांचा मृत्यू झाला. तर शनिवारी राज्यात ३४,४२५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत.

राज्याचा सकारात्मक दर ३५.२० टक्के आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात १३,४०२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी जिल्ह्यात ७,३७९ रुग्ण कोरोनमुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.

Advertisements

Related Stories

कर्नाटकः काँग्रेसकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

triratna

बेंगळूर हिंसाचार प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी

triratna

बेंगळूर: शासकीय मेडिकल कॉलेजला आता वाजपेयीचं नाव

Shankar_P

एरो इंडिया शोसाठी बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्धवट बंद असणार

Shankar_P

दावणगेरेत क्वॉरीवर छापा बेकायदा स्फोटके जप्त

Amit Kulkarni

कर्नाटक : आणखी एका महिलेला नवीन विषाणूची लागण

Shankar_P
error: Content is protected !!