तरुण भारत

महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई/प्रतिनिधी

राज्यात करोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झालेली दिसली. राज्यात दिवसभरात ३४,८४८ नवे रुग्ण आढळले असून ९६० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी झाली. तर दिलासादायक बाब म्हणजे ५९ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्णसंख्या कमी होत असतानाच उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होत आहे. राज्यात सध्या ४ लाख ९४ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. शनिवारी दिवसभरात ५९ हजार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गत महिन्याच्या तुलनेत परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

गेल्या २४ तासांत मुंबई १४४७, नगर जिल्हा २९१७, पिंपरी-चिंचवड ८९५, ठाणे ३१०, पुणे शहर १७८२, उर्वरित पुणे जिल्हा २६९४, सोलापूर २३९१, सातारा १६५५, कोल्हापूर १५७९, नाशिक जिल्हा १०३५, नाशिक शहर ९२१, उर्वरित नागपूर शहर ८११, चंद्रपूर जिल्हा ९७८ याप्रमाणे नवे रुग्ण आढळले.

मृतांमध्ये नागपूर विभाग १४४, सोलापूर ९१, मुंबई ६२, कल्याण-डोंबिवली ४२, नगर २९, जळगाव २४, रत्नागिरी २८, सिंधुदुर्ग २१, बीड ३५ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

Advertisements

Related Stories

खूनप्रकरणी फलटणच्या एकास जन्मठेप

Patil_p

दारुसाठी पैसे न दिल्याने एकावर कोयत्याने वार

Patil_p

मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकला

pradnya p

संचित धुमाळ यांच्यासह दोघांना तीन दिवसांची कोठडी

Patil_p

माढा तालुक्याच्या चिंतेत भर, ८ रुग्णांची वाढ

triratna

नवोदित मल्लांनी महाराष्ट्राचे नाव देशाबाहेरही उज्वल करावे – राहुल आवारे

triratna
error: Content is protected !!