तरुण भारत

देशात कोरोना लाट तीव्र ! गेल्या २४ तासांत चार हजारपेक्षा अधिक बळी

ऑनलाईंन टीम / नवी दिल्ली


देशातील कोरोनाची लाट थांबता थांबेना अशी स्थिती कायम आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कोरोना बळींच्या संख्येत मात्र कमी होत नसल्याचे चित्र स्पष्ट आहे.

देशात दररोज सुमारे साडेतीन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील मृतांचा आकडा चार हजार सत्याहत्तरवर पोहोचला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. तर देशभरात दिवसात आढळून आलेली रुग्ण संख्या तीन लाख अकरा हजार झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तीन लाख बासष्ट हजार झाली आहे.

Advertisements

कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक झाली असल्याने ती अधिक दिलासादायक बाब आहे. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०७७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Related Stories

दिल्लीत पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत झाला घटस्फोटाचा निर्णय

pradnya p

पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षणातंर्गत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

Video : घोड्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

triratna

कोल्हापूर : आकुर्ळ जंगलात बंदुकीने डुकराची शिकार, वनविभागाच्या निदर्शनात येताच शिकारी पसार

triratna

नुकसानीचा राजकीय ‘पंचनामा’

triratna

अंगणवाडी सेविकांना ठाकरे सरकारकडून खास भाऊबीज भेट!

pradnya p
error: Content is protected !!