तरुण भारत

पडळ येथे ट्रॅक्टरच्या धडकेत म्हाळुंगे तर्फ बोरगावचा वृद्ध ठार

प्रतिनिधी / पन्हाळा

बिलवर टेकडी पडळ (ता पन्हाळा ) येथील आपल्या शेताकडे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने म्हाळुंगे तर्फ बोरगाव येथील बापुसो भाऊ वरपे (वय ७० ) यांचा मृत्यू झाला असून अजित संगाप्पा मुजुमदार हे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बिलवर टेकडी शेजारी धोक्याच्या वळणावर शनिवारी घडली असून पन्हाळा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

 याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी मयत बापुसो वरपे यांची जमिन येथील बिलवर टेकडी शेजारी आहे . गावातील पोलीस कर्मचारी अजित मुजुमदार यांच्या मोटरसायकलवरून ते बिलवर टेकडी शेजारी असलेल्या धोक्याच्या वळणावर आपल्या शेताकडे जाण्यासाठी उतरत असतानाच पाठीमागून आलेल्या खडीने भरलेल्या ट्रॅक्टर एम एच 09 एफ क्यु 2628 वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरची धडक बसुन बापुसो वरपे हे गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला तर मोटरसायकल चालक पोलीस कर्मचारी अजित मुजुमदार यांना किरकोळ इजा झाली. याबाबत या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला.

Advertisements

Related Stories

राज्याची परिस्थिती चांगली कशी : चंद्रकांत पाटील

triratna

बालिंगे पुलावरील ‘ त्या ‘ पीपीई किटची तरुणांनी लावली विल्हेवाट

triratna

कागल रस्त्यावर ट्रकच्या धडकेत गरोदर महिलेचा जागीच मृत्यू

Shankar_P

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जेईई व नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात – आ.पी एन पाटील

triratna

पदोन्नतीतील आरक्षण रद्दच्या शासन निर्णयाला स्थगिती नाही

triratna

गगनबावडा कोरोना सेंटरमधील रुग्णांना साहित्य वाटप

Shankar_P
error: Content is protected !!