तरुण भारत

सांगली : विजेचा धक्का लागून शिपुर येथील तरुणाचा मृत्यू

वार्ताहर / सलगरे

वादळी पावसामुळे घरातील वीज मीटरमध्ये शॉर्ट होऊन वीज पुरवठा बंद झाल्याने त्याची दुरुस्त करत असताना दिलीप शिवाजी भोसले (वय ३५) या तरुणाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील शिपुर येथे शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Advertisements

शिपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर लिंगनूर रस्त्याला लागून दिलीप भोसले यांची मळ्यात वस्ती आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने त्यांच्या घरातील वीज गेली होती. रात्री दीडच्या सुमारास दिलीप स्वतःच विजेची दुरूस्ती करत होते. त्यावेळी प्लेटमध्ये पीन घालताना त्यांना वीजेचा जोराचा शॉक लागला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी त्यांच्या घरातील सर्वजण झोपी गेले होते. बराच उशीर दिलीप जागेवर नसल्याचे पाहून त्यांच्या पत्नीने फोन लावल्यावर आंगणातून फोनची रिंग ऐकू आली आणि बाहेर दिलीप यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला.

Related Stories

१०१ व्या वर्षीही त्यांना ना शुगर, ना बी.पी

triratna

खटाव येथे आरोग्य उपकेंद्रात चोरी

triratna

कोंबडीचोर मित्रांकडून पोल्ट्रीचालकाची फसवणूक

triratna

सांगली : एलईडी दिव्यांनी उजळणार महापालिका क्षेत्र

triratna

सांगली : जत येथे शनिवारी कोरोनाचे नऊ रुग्ण

Shankar_P

सांगली : औषध विक्रेत्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र असंतोष : जगन्नाथ शिंदे

triratna
error: Content is protected !!