तरुण भारत

रत्नागिरी जिल्ह्यात ‘तौक्ते चक्रीवादळ’ दाखल

प्रतिनिधी / रत्नागिरी

तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचेही स्थलांतर केले आहे. तर आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून, झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जैतापुरात वाऱ्यामुळे घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. वादळाला वारे हळूहळू रत्नागिरीकडे सरकत आहेत. या वादळचा पुढे सारकण्याचा वेग 7 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.

Advertisements

मध्य रत्नागिरी व राजापूरपासून १०२ किलोमीटर अंतरावर वादळ

तीव्रता आणि गतीत वाढ झाल्याने तौक्ते चक्रीवादळ हे मध्य रत्नागिरी व राजापूरपासून १०२ किलोमीटर अंतरावर आहे. पुढील दोन तासात समुद्रकिनार्‍यालगतच्या गावात वाऱ्याची तीव्रता जाणवणार आहे.

Related Stories

औषधांना फुटले पाय, अधिकारी, कर्मचारी दोषी !

triratna

सातारा : पोवई नाका येथे शहीद जवानांना श्रद्धांजली

triratna

चिंताजनक : महाराष्ट्रात 16,408 नवे कोरोना रुग्ण; 296 मृत्यू

pradnya p

रस्ता सुरक्षेच्या काळात बेशिस्तीचा विक्रम

Patil_p

वेत्ये समुद्रकिनारी आढळली 100 अंडी!

Patil_p

UPSC परीक्षेत इस्लामपूरच्या निमिष पाटीलचे यश

Shankar_P
error: Content is protected !!