तरुण भारत

सातारा : सेवानिवृत्तीनंतरही एसटीसाठीच झटणारा अवलिया

नोकरी लागण्यापूर्वी ते गावात टेलर काम करायचे, तानाजी जाधवांना कलेचा छंद लहाणपणापासूनच

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

छंद असावा नव्या संकल्पाचा, नव्या ध्येयाचा, दिशा देणारा असाच. जावळी तालुक्यातील केसकरवाडीचे तानाजी जाधव हे एसटीतील सेवानिवृत्त वाहतूक अधिकारी. त्यांनी एसटीमध्ये सेवेत असतानाच प्रवासी वाढवा या अभियानाकरता स्वतःच्या संकल्पनेतून एसटीच्या प्रतिकृती करुन प्रदर्शन भरवत राहिले. राज्यभर त्यांच्या या अनोख्या प्रदर्शनाला पसंती मिळत होती. सध्या लॉकडाऊनमध्ये स्वतः मुळ गावी असून एसटीतील आठवणी सांगत रमत आपला छंद कसा जोपसला हे ते आर्वजून मित्रांना सांगताना दिसतात.

जावळी तालुक्यातील केसकरवाडी या छोट्याशा गावात तानाजी जाधव यांचे कसेबसे इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण झाले. लहानपणापासून गावात मित्रमेळा जमवून वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा छंद. त्यातच मित्राच्या सहाय्याने टेलरचे काम शिकले. टेलर काम करताना दुसऱ्या मित्राच्या मदतीने ते ट्रक ड्रायव्हिंग शिकण्यासाठी गेले अन् ड्रायव्हर बनले. त्यांनी ठाणे आगारात १९८२ ला अर्ज केला अन् ते चालक पदावर रुजू झाले. पुढे अंतर्गत परीक्षा देवून वाहतूक अधिकारी बनले अन् त्याचवेळी खाजगी वाहतूक वाढली होती. त्यांनी गणेशोत्सवामध्ये गावी एसटीचा देखावा केला होता. एसटीच्या कामकाजाची माहिती त्या देखाव्यातून दिली होती. त्याच संकल्पनेतुन त्यांनी एसटीच्या प्रतिकृती बनवल्या अन् १९९४ ला त्यांनी प्रदर्शन भरवलं. अगदी सुरुवातीच्या एसटीपासून ते आतापर्यंतच्या शिवशाहीपर्यंतच्या सर्व बस मॉडेलच्या प्रतिकृती त्यांच्या प्रदर्शनात आहेत.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते उल्हासनगर येथेच स्थायिक झाले. त्यांनी तेथे याच कलेच्या जोरावर छोटासा कारखाना टाकला अन् एसटीसाठी सेवानिवृत्तीनंतर प्रबोधनाचे काम सुरु ठेवले. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, कलेमध्ये खुप काही असते. एसटीत चालक असताना विना अपघात सेवा केली. प्रवाशांना चांगली सेवा दिली. एसटीसाठी अजूनही काहीतरी करायची इच्छा होती म्हणून मी एसटीच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवतो. सध्या लॉकडाऊनमुळे गावीच आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 283 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर 672 नमुने पाठविले तपासणीला

triratna

काशीळ येथे दोन एसटी बसचा अपघात

Patil_p

सातारा : ट्रक पलटी होऊन एकजण जखमी

triratna

बँका बंद

Patil_p

सातारा : गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांचेकडून पुरपरिस्थितीची पाहणी

triratna

धामणेरला सुंदर गाव पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!