तरुण भारत

सोलापूर शहरात 69, तर ग्रामीण भागात 2184 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एकाच दिवशी जिल्ह्यात 44 जणांचा मृत्यू

 
प्रतिनिधी /  सोलापूर

Advertisements

सोलापूर  शहरात रविवारी 69 तर ग्रामीण भागात 2184 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 44 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज नवे कोरोनाबाधित 2184 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 37  रुग्णांचा मृत्यू तर 2546  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 2184  पैकी 1273 पुरुष, 960  स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 2224 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 4514   कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 16 हजार 140 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली. 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 6781 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  4597 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर  2184 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2284 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 86 हजार 143 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 
सोलापुर शहरात  नव्याने 69 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.  उपचार दरम्यान झाल्याने  7 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

सोलापुर शहरात  1709 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 69 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1640 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 69 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 45 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27  हजार 496 झाली आहे.

Related Stories

पर्यावरणाचा सर्वच क्षेत्रांशी संबंध – रजनीश जोशी

triratna

तरुण भारत इम्पॅक्ट : सुलाखे हायस्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार बंदचे आदेश

triratna

अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीमध्ये एचआर मीट संपन्न

prashant_c

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के, शिक्षक मतदारसंघसाठी 85.09 टक्के मतदान

Shankar_P

आषाढी वारी नसली तरी फेसबुकवर ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण

triratna

triratna
error: Content is protected !!