तरुण भारत

दोन वर्षात पाहिल्या हजारो उडत्या तबकडय़ा

अमेरिकेच्या ग्रेव्हज नामक माजी नौसैनिक विमानचालकाने असा दावा केला आहे, की त्याने दोन वर्षात प्रतिबंधित वायुक्षेत्रामध्ये हजारो उडत्या तबकडय़ा पाहिल्या आहेत. 2019 च्या प्रारंभापासून व्हर्जिनियाच्या समुद्रतटावर जवळजवळ रोज त्याने हे अद्भूत दृश्य पाहिले आहे, असे त्याने शपथेवर सांगितले आहे. या अज्ञात उडत्या तबकडय़ा कोठून आल्या आणि त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? यासंबंधी संशोधन करावे. या तबकडय़ांपासून अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. या तबकडय़ा परग्रहावरून आलेल्या आहेत की पृथ्वीवरीलच कोणत्या तरी देशाचा तो खोडसाळपणा आहे, याची अमेरिकेने पडताळणी करावी. आपल्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्याचे म्हणणे आहे.

आश्चर्य म्हणजे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने या उडत्या तबकडय़ा दिसल्याचे समर्थन केले आहे. नासाच्या म्हणण्यानुसार उडत्या तबकडय़ा ही वस्तुस्थिती असल्याचे आता आपण मान्य केले पाहिजे. त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी विशेष दल नियुक्त करावयास हवे. या उडत्या तबकडय़ा गोल आकाराच्या असतात असे नाही. काही वेळा त्या विमानाच्या आकाराच्याही दिसल्या आहेत. अमेरिकेवर हेरगिरी करण्यासाठी असा कार्यक्रम अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशाने अंमलात आणला आहे का? याचीही चौकशी व्हावी, अशी ग्रेव्हजची मागणी आहे. एकंदर उडत्या तबकडय़ांचा प्रश्न पुन्हा जागृत झाला आहे.

Advertisements

Related Stories

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

datta jadhav

भारतातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 95 लाखांचा टप्पा

pradnya p

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

प्रियांका गांधींनी म्युकरमायकोसिस इजेक्शन कमतरेतवरून साधला मोदी सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

triratna

स्वस्त पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे आश्वासन

Patil_p

उत्तराखंडमधील बेपत्तांचा आकडा ‘दोनशे’पार

Patil_p
error: Content is protected !!