तरुण भारत

अफगाण धोरणावर चीनची अमेरिकेवर टीका

वृत्तसंस्था/ बिजींग

अमेरिकेने अफगाणिस्तानामधून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला असून तो घाईगडबडीने आणि पूर्ण विचार न करता घेतला आहे, अशी टीका चीनने केली आहे. अमेरिकेचे सैनिक माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानात परिस्थिती चिघळण्ण्याची शक्यता असून संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करावा. परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेची तयारी करावी, असे आवाहनही चीनने केले आहे.

Advertisements

अमेरिका आणि तालिबान यांची तडजोड चर्चा असफल झाल्यानंतर अमेरिकेने येत्या सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानामधून आपले सर्व सैनिक माघारी बोलाविण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यामुळे अवघ्या चार महिन्यात अमेरिका अफगाणिस्तान सोडणार आहे. तथापि त्या देशांची परिस्थिती अद्यापही स्थिरावलेली नाही. अमेरिकेचे सैन्य माघारी फिरताच अफगाणिस्तान इस्लामी अतिरेकी आणि दहशतवाद्यांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत.

पाकिस्तानचे चार सैनिक ठार

तालिबानच्या काही गटांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर दोन ठिकाणी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले आहेत. त्यामुळे तालिबानची झळ आता पाकिस्तानलाही बसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनच्या विदेशमंत्र्यांची नुकतीच इस्लामाबाद येथे बैठक झाली होती. त्यात तालिबानसह अफगाणिस्तानचा विचार करण्यात आला.

Related Stories

हिमघुबड दिसला तोही 130 वर्षांनी

Patil_p

झिंकची कमतरता असल्यास मृत्यूचा धोका अधिक

Patil_p

अमेरिकेत मिळाली विषारी कोळय़ाची नवी प्रजाती

Patil_p

युएनजीए अध्यक्षपदी अब्दुल्ला शाहिद यांची निवड

Patil_p

आजारी हत्तीला पाकपासून मिळणार स्वातंत्र्य

Patil_p

रशियात चाकूहल्ला; 16 वर्षीय तरुणाने पोलिसाला भोसकले

datta jadhav
error: Content is protected !!