तरुण भारत

आधार कार्ड नसले तरीही कोरोनाची लस मिळणार

उपचार देणेही बंधनकारक – ‘यूआयडीएआय’चे निर्देश

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. तसेच त्याला कोणताही वैद्यकीय उपचार नाकारता येत  नसल्याचे स्पष्टीकरण युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात ‘यूआयडीएआय’ने स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकरणामुळे आता एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ‘यूआयडीएआय’चा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात दाखल करून न घेणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणे या गोष्टी आता बंद होणार आहेत. उपचार किंवा लसीसाठी आधारकार्डचे बंधन नसल्याचे ‘यूआयडीएआय’ने स्पष्ट केल्यामुळे आता आधार नंबर नसलेल्या व्यक्ती किंवा आधारकार्ड गहाळ झालेल्या व्यक्तींना दिलासा मिळणार आहे. आता हा प्रश्न सुटला असून एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्याला आता कोरोनाची लस मिळणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून लस लाभार्थींसाठी आधारकार्ड अत्यावश्यक असल्याचे सांगितले जात होते. तसेच ऑनलाईन नोंदणी करतानाही आधारकार्ड नंबरची विचारणा केली जात होती. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. तसेच अनेकदा केवळ आधार कार्ड नसल्याने लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच अनेक वस्तूंपासून वंचित ठेवले जायचे. कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच उपचार आणि औषधांसाठीही या गोष्टी घडताना दिसत होत्या. आता ‘यूआयडीएआय’च्या स्पष्टीकरणामुळे या गोष्टीवर पडदा पडला आहे.

उपचारांसाठी रुग्णालयांतील एन्ट्रीही होणार सुकर

देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हते. त्यामुळे रुग्णालयेही अशा रुग्णांना भरती करून घ्यायला नकार द्यायचे. आता या गोष्टीसाठी आधार कार्डची गरज नसल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्पष्टोक्तीमुळे संभ्रमावस्था दूर

कोरोनाची लस घ्यायची असेल तर आपली ओळख म्हणून आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच गेली चार महिने यावर कोणतेही स्पष्टीकरण केंद्र सरकार वा ‘यूआयडीएआय’कडून आले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या संभ्रमात वाढ झाली होती.  

….तर ‘आयआरडीए’कडे करा तक्रार !

आधारकार्ड नसल्यामुळे लसीकरण किंवा उपचार या सेवा देण्यास कुणी नकार दिला तर संबंधित व्यक्तीने त्या-त्या विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांकडे याबाबतची तक्रार करावी, असेही सांगण्यात आले आहे. जर एखाद्या रुग्णालयाने आधारशिवाय उपचार देण्यास नकार दिला तर त्याची तक्रार ‘आयआरडीए’कडे केली जाऊ शकते, असे ‘यूआयडीएआय’ने स्पष्ट केले आहे.

Related Stories

छत्तीसगड : चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलीस उपनिरीक्षक शहीद

pradnya p

भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांचा फोन आला; यड्रावकरांचा खुलासा

Shankar_P

टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा; इतका मुद्देमाल जप्त

triratna

दिल्लीत 256 नवे कोरोनाबाधित

pradnya p

150 देशांचा जीडीपी ‘आत्मनिर्भर’ पॅकेजपेक्षा कमी

Patil_p

लोन मोरेटोरियमला मुदतवाढ नाही : सर्वोच्च न्यायालय

datta jadhav
error: Content is protected !!