तरुण भारत

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची दुसरी खेप दाखल

चालू आठवडय़ातच देशात वितरण सुरू होणार

हैदराबाद / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या दरम्यान भारतात रशियाच्या स्पुटनिक -व्ही लसीची दुसरी खेप दाखल झाली आहे. रविवारी सकाळी विमानाने या लसी हैदराबाद येथे आल्या आहेत. आता येत्या आठवडय़ातच या लसीचे देशात विविध ठिकाणी वितरण केले जाणार आहे. यापूर्वी 1 मे रोजी स्पुटनिक-व्ही लसीची पहिली खेप देशात दाखल झाली होती.

भारतात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारी स्पुटनिक-व्ही ही पहिलीच विदेशी लस आहे. ही लस हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिजकडून बाजारात आणली जाणार आहे. स्पुटनिक-व्ही लसीची किंमत 995 रुपये निश्चित करण्यात आली आहे. येत्या आठवडय़ातच ही लस बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आयातीनंतर स्पुटनिक-व्ही लसीचे लवकरच भारतात उत्पादन सुरू होणार आहे. उत्पादन सुरू झाल्यानंतर दरवर्षी जवळपास 85 कोटी व्हॅक्सिनची निर्मिती केली जाणार आहे.

Related Stories

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

prashant_c

गुजरातमध्ये नवरात्रोत्सव गरब्याविना!

Patil_p

शिवसेना प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

triratna

चालत्या गाडीतून गुटखा थुंकणे पडले महागात; भरावा लागला 500 रुपये दंड

Rohan_P

कोरोनाचा कहर : देशात 96,424 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 52 लाखांवर

Rohan_P

सातारा : गुळुंबच्या दोन युवकांची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

triratna
error: Content is protected !!