तरुण भारत

मोदींविरोधात पोस्टरबाजी ; दिल्लीत 25 जणांना अटक

गुन्हे-अटकसत्रानंतर राहुल-प्रियंका गांधींनीही पोस्टर केले शेअर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लसीकरणाबाबत टीका करणारी पोस्टर (पत्रके) चिकटवल्याने दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल करत 25 जणांना अटक केली आहे. या कारवाईनंतर काँग्रेसने आवाज उठवत अटक केलेल्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. तसेच राहुल आणि प्रियंका गांधी यांनी सदर पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत व्हायरल केले आहे. भित्तीपत्रकांत ‘मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्मयू भेज दिया’ असा मजकूर दिसून येत आहे. याच पोस्टरला अनुसरून राहुल गांधी यांनी ‘मलाही अटक करा’ असे ट्विट केले. तर प्रियंका गांधी यांनी त्या पोस्टरला आपला प्रोफाईल पिक्चर बनवला आहे.

दिल्लीतील विविध भागात करण्यात आलेल्या पोस्टरबाजीप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून कुणाच्या वतीने ही भित्तीपत्रके चिकटवण्यात आली याचा शोध घेतला जात आहे. मोदी यांच्या विरोधातील भित्तीपत्रके शहरात अनेक ठिकाणी चिकटवण्यात आली होती. भादंवि 188 तसेच मालमत्ता विद्रुपीकरणविरोधी कायद्यानुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशात कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यासंदर्भात पावले उचलली होती. मात्र देशात लसींचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच केंद्र सरकारवर टीका होत आहे.

Related Stories

”केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे”

triratna

एकाचवेळी 9 न्यायाधीशांनी घेतली शपथ

Patil_p

पंजाबमध्ये 748 नवे कोरोना रुग्ण; 731 कोरोनामुक्त!

Rohan_P

होमवर्कने त्रस्त मुलीची ‘मोदी साब’कडे तक्रार

Amit Kulkarni

चिंता वाढली : महाराष्ट्रातील 11,920 पोलिसांना कोरोनाची बाधा

Rohan_P

‘या’ विमानतळाला मिळाली ‘इंटरनॅशनल कुरिअर हब’ची मान्यता

datta jadhav
error: Content is protected !!