तरुण भारत

माजी अष्टपैलू राजेंद्रसिंग जडेजाचे कोरोनाने निधन

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबई आणि सौराष्ट्र संघाकडून खेळणारे माजी अष्टपैलू राजेंद्रसिंग जडेजा यांचे रविवारी वयाच्या 66 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. जडेजा काही दिवस बीसीसीआयचे सामनाधिकारी होते.

Advertisements

1974-75 तसेच 1986-87 च्या क्रिकेट हंगामात राजेंद्रसिंग जडेजा यांनी 50 प्रथमश्रेणी सामन्यात फलंदाजीत 1536 धावा आणि गोलंदाजीत 134 बळी नोंदविले होते. जडेजा मध्यमगती गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज म्हणून ओळखले गेले. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अ दर्जाचे 11 सामने खेळले असून त्यामध्ये 14 बळी मिळविले होते. क्रिकेट क्षेत्रातील निवृत्तीनंतर त्यांनी 53 प्रथमश्रेणी सामन्यात बीसीसीआयचे सामनाधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी केली. मुंबई बरोबर त्यांचे जवळचे संबंध होते. टाईम्स शिल्ड स्पर्धेत ते निर्लान संघाकडून खेळत असत. शालेय दिवसामध्ये ते सुनील गावसकर यांच्याबरोबर क्रिकेट खेळत होते. मुंबईतील सिद्धार्थ आणि पोद्दार कॉलेजच्या क्रिकेट संघाचे ते कर्णधारही होते. मात्र त्यांना भारतीय संघातून खेळण्याची संधी लाभली नाही. मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी तसेच माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर यांनी राजेंद्रसिंग जडेजा यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई संघाकडून खेळल्यानंतर ते काही दिवस सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करत होते. सौराष्ट्र क्रिकेट संघटना तसेच बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा यांनी जडेजा यांना आदरांजली वाहिली आहे.

Related Stories

राष्ट्रीय महामार्गावर ऑक्सिजन टँकरला गळती

Patil_p

सात्विकसाईराज-अश्विनी उपांत्य फेरीत

Patil_p

रशियाचा मेदवेदेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

भारतीय खेळाडूंनी केला कसोटीचा सराव

Patil_p

सनरायजर्स हैदराबादची प्ले-ऑफमध्ये धडक!

Patil_p

लंकेचा बांगलादेशवर विजय, चमीराचे 5 बळी

Patil_p
error: Content is protected !!