तरुण भारत

ऑस्ट्रेलियन पथक सोमवारी मायदेशी रवाना होणार

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

38 सदस्यांचे ऑस्ट्रेलियन पथक मालदीव येथून ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार असून ते पथक सोमवारी मायदेशी दाखल होणार आहे. या पथकामध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि काही प्रशिक्षकांचा समावेश आहे.

Advertisements

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे परिस्थिती चिंताजनक झाल्याने 2021 सालातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा 4 मे रोजी बेमुदत कालावधीसाठी तहकूब करण्यात आली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतातून होणाऱया हवाई प्रवासावर निर्बंध घातल्याने ऑस्ट्रेलियाचे 38 जणांचे हे पथक मालदीवकडे रवाना झाले होते. त्याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचा माईक हसी याला कोरोनाची बाधा झाली होती पण आता तो या व्याधीतून पूर्ण बरा झाला असून सोमवारी तो ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. मालदीवमध्ये वास्तव्य असलेल्या ऑस्ट्रेलियन पथकामध्ये पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह सिमथ, मायकेल स्लॅटर यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे हे सर्व खेळाडू बीसीसीआयच्या चार्टर विमानाने ऑस्ट्रेलियाला प्रयाण करतील. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मायदेशी परतण्यासाठी बीसीसीआयने केलेल्या प्रयत्नाबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकली यांनी भारतीय क्रिकेट मंडळाचे कौतुक केले आहे.

Related Stories

न्यूझीलंडची सावध सुरुवात

Patil_p

विश्वनाथन आनंदचा पहिला विजय

Patil_p

इंग्लंड संघात स्टोक्स, आर्चरचे पुनरागमन

Amit Kulkarni

रिचर्डसनला ऑलिम्पिक हुकणार

Patil_p

स्पेनचा डेव्हिड ग्रँड जमशेदपूर एफसी संघात दाखल

Patil_p

भारतीय फुटबॉल संघ दोहामध्ये दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!