तरुण भारत

न्यूझीलंडचे खेळाडू इंग्लंडला रवाना

वृत्तसंस्था/ ऑकलंड

न्यूझीलंडचे क्रिकेटपटू शनिवारी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका व भारताविरुद्ध होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत खेळण्यासाठी इंग्लंडकडे रवाना झाले.

Advertisements

इंग्लंडविरुद्ध होणारी त्यांची दोन कसोटींची मालिका 2 जूनपासून सुरू होणार असून डब्ल्यूटीसी फायनल 18 जूनपासून साऊदम्प्टनमध्ये होणार आहे.  ‘टाईम टू फ्लाय’ असे न्यूझीलंडच्या ट्विटर हँडलवर प्रयाण करण्यापूर्वी संदेश देण्यात आला. कर्णधार केन विल्यम्सन, काईल जेमीसन, मिशेल सँटनर हे आयपीएलमध्ये भाग घेतलेले खेळाडू सध्या मालदिवमध्ये असून तेथूनच ते इंग्लंडला प्रयाण करणार आहेत. हे तिघेही दिल्लीहून मालदिवमधील माले येथे रवाना झाले होते. आयपीएलमधून मायदेशी परतलेला त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मात्र इंग्लंडविरुद्धची मालिका व भारताविरुद्धची अंतिम लढत दोन्हीही हुकण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात भारतीय संघ इंग्लंडकडे प्रयाण करण्याची अपेक्षा असून त्याआधी ते मुंबईमध्ये हार्ड क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत.

Related Stories

ओपेल्काचा मेदवेदेवला धक्का, शॅपोव्हॅलोव्हची आगेकूच

Patil_p

वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप अंतिम लढत लांबणीवर?

Patil_p

भारत अ संघाचा निसटता पराभव

Patil_p

डकार रॅलीवेळी भारताच्या संतोषचा भीषण अपघात

Patil_p

मागील दोन वर्षात माझा प्रगल्भतेकडे प्रवास

Patil_p

कँडिडेट्स स्पर्धेत नेपोमनियाची विजेता

Patil_p
error: Content is protected !!