तरुण भारत

सुशीलकुमारविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या एका मल्लाच्या मृत्यू प्रकरणात दिल्ली न्यायालयाने शनिवारी भारताचा आंतराष्ट्रीय मल्ल सुशीलकुमारसह अन्य सहा व्यक्तींवर अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे.

Advertisements

छत्रसाल स्टेडियम प्रकरणात झालेल्या या घटनेनंतर सुशीलकुमारविरूद्ध लूकआऊटची नोटीस बजाविण्यात आली होती. छत्रसाल स्टेडियम प्रकरणात बळी पडलेल्याची कैफियत यापूर्वीच पोलिसांनी नोंद करून घेतली होती. मॉडेलटाऊन परिसरातील एक फ्लॅट रिकामा करण्यावरून झालेल्या मारामारीमध्ये 23 वर्षीय मल्लाचा मृत्यू झाला. छत्रसाल स्टेडियममध्ये एका गटाच्या मल्लांनी दुसऱया गटातील काही जणांवर गेल्या मंगळवारी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन मल्ल जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने सुशीलकुमारसह अन्य सहा जणांवर अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे.

Related Stories

भारताचे फ्रीस्टाईल मल्ल पात्रतेविना माघारी

Patil_p

ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सलग नववा विजय

Patil_p

मुष्टियुद्ध सरावासाठी ‘साई’चे पतियाळा केंद्र सज्ज

Patil_p

गोलंदाजी करत नसेल तर हार्दिक वनडे, टी-20 साठीही पात्र नाही!

Patil_p

तंत्रशुद्धतेत राहुल द्रविड सर्वोत्तम भारतीय फलंदाज

Patil_p

वेगवान 2 हजार धावा जमवणारा पहिला भारतीय फलंदाज…केएल राहुल

Patil_p
error: Content is protected !!