तरुण भारत

जोकोविच-नदालमध्ये अंतिम लढत

वृत्तसंस्था/ रोम

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड जोकोविच आणि स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होणार आहे.

Advertisements

शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात जोकोविचने इटलीच्या सोनेगोचा 6-3, 6-7 (5-7), 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या जोकोविचला उपांत्य फेरीतील लढतीसाठी तब्बल तीन तास झगडावे लागले. दुसऱया उपांत्य सामन्यात स्पेनच्या नदालने अमेरिकेच्या ओपेल्कावर 6-4, 6-4 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. नदालने ही स्पर्धा यापूर्वी नऊवेळा जिंकली आहे. नदाल आणि जोकोव्हिक यांच्यात आतापर्यंत 56 वेळा लढती झाल्या आहेत. या स्पर्धेत जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रीसच्या सित्सिपसने चांगलेच झुंजविले होते पण तब्बल सव्वा तीन तासांनंतर जोकोविचने सित्सिपसवर विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. जोकोविचने एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेत आतापर्यंत 36 विक्रमी विजेतेपदे मिळविली आहेत.

Related Stories

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून कुझेनत्सोव्हाची माघार

Patil_p

ब्राझील, कोलंबिया संघांचे विजय

Patil_p

सेतु एफसीच्या विजयात संध्याची चमक

Patil_p

केकेआर ‘शेर’, मुंबई इंडियन्स ‘सव्वाशेर’!

Patil_p

के.श्रीकांतची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Patil_p

वेन रूनीचा मुलगा केई मँचेस्टर युनायटेडशी करारबद्ध

Patil_p
error: Content is protected !!