तरुण भारत

पॅराऑलिम्पिक खेळाडूंची निवड पुढील महिन्यात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱया टोकियो पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पॅराऍथलेटिक्स संघाची निवड दोन दिवसांच्या निवड चाचणीनंतर करण्यात येणार आहे. सदर चाचणी 15 व 16 जून रोजी घेतली जाणार आहे, असे राष्ट्रीय पॅराऑम्पिक संघटनेने जाहीर केले.

Advertisements

कोव्हिड 19 साठी घालून देण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करीत या चाचणी घेतल्या जाणार आहेत. ‘चाचणीत सहभागी होणाऱया क्रीडापटूंना 72 तास आधी काढलेला कोव्हिड 19 चा निगेटिव्ह अहवाल आणणे बंधनकारक असणार आहे,’ असे भारतीय पॅराऑलिम्पिक समितीने (पीसीआय) सांगितले. ज्या खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे (आयपीसी) परवानापत्र असेल तसेच टोकियो पॅरालिम्पिकसाठी ज्यांनी किमान पात्रता मिळविली आहे, अशा खेळाडूंनाच चाचणीला उपस्थित राहता येणार आहे. याशिवाय खेळाडूंकडे नऊ महिन्यांसाठी वैध असलेले पासपोर्ट असणेही आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. 2016 च्या रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या 19 जणांच्या पथकात 15 पॅराऍथलेट्सचा समावेश होता आणि त्यांनी 2 सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली होती.

Related Stories

इंग्लंडचा भारत दौरा कार्यक्रम घोषित

Patil_p

कॅमेरुन व्हॉईट निवृत्त

Patil_p

पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान

Patil_p

राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धा लांबणीवर

Patil_p

दुबई पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, प्रमोद, मानसीची निवड

Patil_p

साबा करीम यांचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!