तरुण भारत

बेल्जियमची अमेरिकेवर मात

एफआयएच महिला प्रो हॉकी लीग – तीन गोल्सनी एकतर्फी विजय

वृत्तसंस्था/ अँटवर्प

Advertisements

येथे झालेल्या एफआयएच प्रो हॉकी लीगमधील महिलांच्या सामन्यात बेल्जियमने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या अमेरिका संघावर 3-0 अशा गोलफरकाने विजय मिळविला.

2020-21 मोहिमेतील बेल्जियमचा हा दुसरा विजय आहे. लीगच्या क्रमवारीत हा संघ सातव्या स्थानावर असला तरी त्यांची जिंकण्याची टक्केवारी 33.3 अशी सुधारली आहे. अमेरिका संघ मात्र या लीगमध्ये तळाच्या स्थानावर कायम आहे. फेब्रुवारी 2020 नंतर लीगमधील त्यांचा हा पहिलाच सामना होता. अमेरिकेने या सामन्यात तब्बल पाच नवोदित खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. मात्र या सामन्यात बेल्जियमने वर्चस्व राखल्याने अमेरिकन खेळाडूंना बचाव करण्यावरच जास्त भर द्यावा लागला. बेल्जियमने बॉल पझेशनमध्ये वर्चस्व ठेवत अनेक संधी निर्माण केल्या आणि अमेरिकन क्षेत्रातच जास्त वेळ खेळ चालला होता.

स्ट्रायकर अँब्रे बॅलनघीनला पूर्वार्धातच हॅट्ट्रिकची संधी होती. पण अमेरिकेची गोलरक्षक केल्सी बिंगने अप्रतिम गोलरक्षण करून तिला ही संधी मिळू दिली नाही. पहिल्या दोन सत्रात बिंग फक्त एकदाच चुकली होती. त्यावेळी ऍबी रेयेने अगदी जवळून चेंडू डिफ्लेक्ट करीत बेल्जियमचा गोल नोंदवला होता. उत्तरार्धातही बेल्जियमने आपले वर्चस्व कायम राखत आणखी दोन गोलांची भर घातली. टायफेन डुकेन्सने पेनल्टी कॉर्नरवर त्यातील एक गोल नोंदवला. त्यानंतर रेयेने सामना संपण्यास दोन मिनिटे असताना संघाचा तिसरा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला.

‘या सामन्यातील कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. आमच्यासाठी त्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत,’ असे बेल्जियमची मिडफिल्डर ज्युडिथ व्हान्डरमीरेन सामन्यानंतर म्हणाली. तिलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान देण्यात आला. ‘दीर्घ काळानंतर एकत्र खेळायला मिळाल्यामुळे संघाला लय मिळण्यास मदत झाली आहे. या सामन्यात तीन गुण मिळविता आले याचा आम्हाला आनंद वाटतो,’ असेही ती म्हणाली. दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल अमेरिकेची कर्णधार अमांदा मॅगाडन हिनेही आनंद व्यक्त केला. याच दोन संघात दुसरा सामना रविवारी उशिरा होणार आहे.

Related Stories

न्यूझीलंडचा पाकवर डावाने विजय

Omkar B

AUS vs IND : भारतासमोरचे 185 धावांचे आव्हान अधिकच खडतर

tarunbharat

सर्व हॉकीपटू कोरोनामुक्त, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

विसरावा असा ‘ओटीपी’ : सेहवाग

Patil_p

अंकित, मनिष उपउपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

राष्ट्रीय बॉक्सिंग कोचलाही कोरोनाची लागण

Patil_p
error: Content is protected !!