तरुण भारत

कराडला सलग दुसऱया दिवशीही झोडपले

तालुक्यात सरासरी 25 मिमि तर सुपने मंडलात सर्वाधिक 52 मिमि पावसाची नोंद

वार्ताहर/ कराड

Advertisements

शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱयासह हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने रविवारीही दिवसभर कराड शहरासह तालुक्याला झोडपून काढले. तालुक्यात सरासरी 25 मिमि पावसाची नोंद झाली. तर सुपने मंडलात सर्वाधिक 52 मिमि पाऊस पडला आहे. अवेळी आलेल्या वादळी वारे व पावसाने शेतीचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

कराड शहरासह तालुक्यात शनिवारी संध्याकाळपासून वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळामुळे पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार शनिवारी दुपारपासूनच तालुक्यात सोसाटय़ाचा वारा वहात होता. तर संध्याकाळी सात नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर उघडझाप करणाऱया पावसाने रविवारी दिवसभर शहरासह तालुक्याला झोडपून काढले.

महसुल विभागाने रविवारी सकाळी घेतलेल्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सरासरी 25 मिमि पावसाची नोंद झाली आहे. मंडल निहाय पाऊस पुढील प्रमाणे, कराड- 38 मिमि, सैदापूर- 40 मिमि, मलकापूर- 37 मिमि, कोपर्डे- 22 मिमि, मसूर- 17 मिमि, उंब्रज- 10 मिमि, शेणोली- 8 मिमि, कवठे- 15 मिमि, काले- 35 मिमि, कोळे- 25 मिमि, उंडाळे- 19 मिमि व सुपने मंडलात सर्वाधिक 52 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

टी अँड टी कंपनीकडून मुख्य जलवाहिनी फुटली

Patil_p

सातारा : ओझर्डेतील जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण

datta jadhav

दहावी भूगोल पाठ्यपुस्तक डिव्हिडीचे सादरीकरण

Shankar_P

सवयभानकडून साताऱ्यात 20 हजार 777 घरांची तपासणी

Shankar_P

भाजप पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी पडळकर, महाडिक यांची वर्णी

triratna

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्याने अरेरावी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना सुनावले

Shankar_P
error: Content is protected !!