तरुण भारत

विलगीकरण कक्ष नसल्यानेच शहरात कोरोना वाढतोय

प्रकाश बडेकर यांचा आरोप, पालिकेने शहरात विलगीकरण कक्ष स्थापन करावे

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जे रुग्ण अति गंभीर आहेत त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी पर्याय नाही. परंतु जे रुग्ण गंभीर नाहीत अशा रुग्णांना क्षेत्रमाहुली येथे विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असल्याने ती जागा ही अपुरी पडत आहे. कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसलेने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतेच पालिकेच्या कारभारावर टीका केलेली होती. 

याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बडेकर यांनी नगरपालिकेचा सांस्कृतिक हॉल तसेच सध्या नगरपालिकेच्या साताऱयातील शाळा इमारती उपलब्ध असून त्या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत असे सुचविले आहे. घरात आवश्यक सुविधा नसतानाही विलगीकरणासाठी घरीच राहण्याचा आग्रह करीत आहेत. यामुळे अनेकजण नियमांची पायमल्ली करत बाहेर बिनधास्त फिरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील अन्य लोकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे बाधितांची साखळी वाढत चालली आहे. त्याचा विचार, नगरपालिका प्रशासनाने करून तातडीने नगरपालिकेचा सांस्कृतिक हॉल तसेच सध्या नगरपालिकेच्या साताऱयातील शाळा इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करावेत, असे आवाहन प्रकाश बडेकर यांनी केले.

Related Stories

मोटर सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या शिरोळच्या दोघांना अटक

Shankar_P

लातूर जिल्ह्यात कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर

triratna

विरोधकांनी अडथळे आणले तरीही महाविकास आघाडी डगमगणार नाही : ना.शंभूराज देसाई

Shankar_P

एमबीबीएसच्या परीक्षा ऑफलाईनच!

pradnya p

जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी विलगीकरणाचे नियोजन सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

triratna

सातारा : वाई येथे नैराश्यातून एकाची आत्महत्या

datta jadhav
error: Content is protected !!