तरुण भारत

बाँबे रेस्टारंट पुलाखाली मामा, भाच्याला मारहाण

मूर्ती खरेदीच्या वादातून प्रकार – एकावर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती परत न केल्याच्या कारणावरुन चिडून जावून एकासह त्याच्या भाच्याला मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शंकर सोलंखी असे जखमीचे तर नरेश बाटीरा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, शंकर कालाजी सोलंखी (वय 30, रा. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली, सातारा. मूळ रा. प्रतापगड, ता. देसुरी, जि. पाले, राज्य ः राजस्थान) हा युवक मूर्तीकार आहे. त्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. ती मूर्ती माझी असून ती मला परत कर असे नरेश धनाजी बाटीरा (रा. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली, सातारा) याने शंकर याला सांगितले. मात्र, शंकर याने ती मी खरेदी केली असून ही मूर्ती माझीच आहे, असे नरेशला सांगितले.

यामुळे चिडून जावून नरेश याने शंकर याला लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या डोक्यात आणि पाठीवरही मारले. यात शंकर जखमी झाला. दरम्यान, ही मारहाण सोडविण्यासाठी शंकर याचा भाचा आला असता त्यालाही शिवीगाळ करत मारहाण झाली. यात भाचाही जखमी झाली. याप्रकरणी शंकर याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नरेश याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.

Related Stories

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

triratna

बांधकाम विभागात सगळेच गायब

Patil_p

तीन मुली मृत्यू प्रकरणाच्या तपासाचे आव्हान

Patil_p

महापुराच्या सामन्यासाठी गावनिहाय आराखडा तयार : पालकमंत्री जयंत पाटील

triratna

इचलकरंजीत नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन अधिक तीव्र – जिल्हाधिकारी

triratna

सातारा : कायदा-सुव्यवस्थे सोबतच बोरगाव पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

triratna
error: Content is protected !!