तरुण भारत

दुचाकी चोरटय़ांची टोळी जेरबंद

एलसीबीची कारवाई -पाच चोरटय़ांना अटक

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा, सांगली, नवी मुंबई येथे दुचाकी चोऱया करणाऱया कराड तालुक्यातील टोळीचा पदार्फाश करत सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणले असून 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत अभिनंदनीय कामगिरी बजावली आहे. तर नुने (ता. पाटण) येथे रेशनिंग दुकानतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोघांना ताब्यात घेतले आहे.

जीवन उर्फ प्राण नामदेव कांबळे (वय 28), व अविनाश आनंदा माने (वय 24), दोघेही रा. कालगाव, ता. कराड, ऋषीकेश अविनाश सावंत (वय 20), रा बुधवार पेठ, कराड अशी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. तर संजय राजाराम धुमाळ (वय 31, रा. तासवडे ता. कराड) व पंकज सुनील पाटील (वय 21, रा. माजगाव ता. पाटण) अशी नुने येथील चोरीप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 13 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना त्यांना उंब्रज शहरात दुचाकी चोरटय़ांची टोळी वावरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने उंब्रज परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला व तिघांना ताब्यात घेतले. या चोरटय़ांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कोपर्डे हवेली (ता. कराड) येथून  10 मे 2021 रोजी एक स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.  त्यानंतर त्यांना या गुन्हय़ात अटक करण्यात आली. कराडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱयांना त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे चौकशी करुन कौशल्यपूर्णतेने तपास केल्यानंतर या चोरटय़ांच्या टोळीने कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीतून 5 मोटार सायकल, कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून 1 मोटार सायकल, कडेगाव पोलीस स्टेशन व तासगाव पोलीस स्टेशन, जि. सांगली हद्दीतून प्रत्येकी 1 अशा 2 मोटार सायकल तसेच कामोठे पोलीस स्टेशन, नवी मुंबई हद्दीतून 1 मोटार सायकल अशा एकुण 9 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्हय़ाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करत असून चोरटय़ांच्या टोळीकडून 7 मोटार सायकल व 1 मोटार सायकलचे इंजिन असा एकुण 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलला आहे.

उंब्रज येथील घरफोडी उघडकीस

दरम्यान, 13 मे 2021 रोजी उंब्रज परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रालिंग  करताना नुने (ता. पाटण) येथील रेशनिंगचे दुकान फोडून दुकानातील तांदळाची पोती चोरी करुन विक्रीसाठी उंब्रज येथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने नमुद पथकाने संशयित दोन्ही चोरटय़ांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून रेशनिंगच्या दुकानातुन चोरी केलेली 2 तांदळाची पोती व गुन्हय़ात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करुन उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक  धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, कॉन्स्टेबल विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, संकेत निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, विजय सावंत, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला.

Related Stories

सातारा : तारगाव येथे जुना रेल्वे पुल कोसळला

Sumit Tambekar

फलटण पालिका कर्मच्यायावर विनयभंग,

Patil_p

मुंबई-बेळगाव विमान प्रवासाला तुर्तास ब्रेक

Abhijeet Shinde

वाईत बाधिताची नैराश्येतून आत्महत्या

Patil_p

सातारा : हार्वेस्टिंग संघटनेच्या अध्यक्षपदी बोरगावचे संजय साळुंखे

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम

Patil_p
error: Content is protected !!