तरुण भारत

जिह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजार पार

नव्याने 486 रूग्ण, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढताच

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

जिह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 30 हजार 336 इतका झाला आह़े तर एकूण मृत्यू 915 झाले आहेत़ मागील एका महिन्यातच रूग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल़ी आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आह़े रविवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 486 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े  तर 10 जणांचा मृत्यू झाला आह़े

  एप्रिल 15 पासून ‘बेक द चेन’ निर्बंध जिह्यात लागू करण्यात आले होत़े  मात्र रूग्णसंख्या वाढतच असल्याचे दिसले आह़े रविवारी करण्यात आलेल्या   आरटीपीसीआर टेस्टमध्ये 205 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 21 तर आधीचे 260 असे 486 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 336 इतकी झाली आह़े तर मागील 24 तासांमध्ये 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 3, चिपळूण 3,  राजापूर 1, संगमेश्वर 2, खेड 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा एकूण मृतांची संख्या 915 इतकी झाली आह़े  तर मृत्यूदर 3.01 इतका आह़े

Related Stories

स्वीडनने स्वीकारली ‘नवी वाट’

NIKHIL_N

शासकीय सेवा घरबसल्या होणार उपलब्ध!

NIKHIL_N

दाभोळमध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी एकावर गुन्हा

Patil_p

रत्नागिरी : कोरोना तपासणीसाठी शिक्षकांच्या रांगा

triratna

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन दोन बळी

triratna

तेरवण येथे गोठय़ाला आग, लाखोंचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!