तरुण भारत

जिल्ह्यात आढळला म्युकर मायकोसिसचा पहिला रुग्ण

जान्हवी पाटील / रत्नागिरी

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश चिंतेत असतानाच आता रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळय़ा बुरशीचा) त्रास जाणवू लागला आहे. राज्यात याचे रुग्ण आढळू लागले असून अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. धक्कादायक म्हणजे रत्नागिरी जिल्हय़ातील संगमेश्वर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सापडला असून त्याच्यावर योग्य ते उपचार करून हायर ट्रीटमेंटसाठी संबंधित रुग्णाला पुण्याला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

Advertisements

आरोग्य विभाग अलर्ट

म्युकरमायकोसिसचा रत्नागिरी जिल्हय़ात एकही रुग्ण आढळला नव्हता, मात्र आता एक रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात या रूग्णांसाठी 5 बेड आरक्षित ठेवण्यात आले असून यासाठी स्वतंत्र वैद्यकीय टीमही सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र मुळात रत्नागिरी जिल्हय़ात कोविडची संख्या कमी होण्याऐवजी वाढतीच असल्याने अद्याप स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले नसले तरी यासाठी आपले नियोजन सुरू असल्याचे डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा शासकीय रूग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सूचना नुकत्याच केल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ातही लवकरच वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. संगमेश्वरमधील एका कोरोनाबाधित रूग्णाच्या नाकात बुरशीजन्य लक्षणे आढळल्याने उपचारासाठी 4-5 दिवसापूर्वी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. येथे योग्य ते उपचार करून अधिक उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

  म्युकरमायकोसिस हा शब्द वा आजार काल-परवापर्यंत कोणाला माहित नव्हता. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये वारंवार हा शब्द कानावर येत असून महाराष्ट्रात या आजाराचे रूग्ण आता आढळू लागले आहेत. कोरोनाच्या संकटाला समोर जात असताना हे नवे आव्हान आता महाराष्ट्रासमोर उभे टाकले आहे. शरीरातील विषाणूची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना विविध औषधे दिली जातात. स्टेरॉईडचा अतिरिक्त डोस दिला जातो. तसेच ऑक्सिजन नळी अस्वच्छ राहिली तरी बुरशी निर्माण होवून या आजाराची शिकार व्हावे लागू शकते. सायनस, डोळे, मेंदू, जबडा वा फुफ्फुसांनाही या बुरशीचा संसर्ग होवू शकतो. तसेच या आजाराचा संसर्ग कर्करोगाच्या पेशींच्या दहापट असल्याचेही सांगितले गेले आहे. प्राथमिक लक्षणे दिसताच वैद्यकीय उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हिरडय़ातून पू येणे, दात हलणे, ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळे दुखणे, लाल होणे, नाक व ओठाजवळ काळसर ठिपका येणे ही लक्षणे म्युकरमायकोसिसचे आहेत. नागरिकांनी सजगता व सावधानता बाळगल्यास हा आजार टाळता येतो, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

अज्ञात आजाराने आणखी एका खलाशाचा मृत्यू

NIKHIL_N

पेरणीनंतर व्यवस्थापन शेतकऱयांना घरबसल्या मार्गदर्शन

Patil_p

अपुऱया डोसमुळे आज लसीकरण बंद

Patil_p

जैतापूर प्रकल्प परिसरातील अडीच लाख रूपयांच्या साहित्याची चोरी

Patil_p

‘पेटारो दशावताराचो’ उपक्रमाला यू-टय़ूबवर उत्स्फूर्त प्रतिसाद

NIKHIL_N

‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कातील 28 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

triratna
error: Content is protected !!