तरुण भारत

राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये ऑक्सिजन बससेवेचा विस्तार करणार

चिक्कमंगळुरात आजपासून सेवेस प्रारंभ : मंत्री लक्ष्मण सवदी यांची माहिती

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

बेंगळूर येथे बीएमटीसीकडून सुरू करण्यात आलेली ऑक्सिजन बससेवा यशस्वी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. चिक्कमंगळूर येथे कर्नाटक परिवहन मंडळाकडून सोमवार 17 पासून ऑक्सिजन बससेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सवदी पुढे म्हणाले, सध्या बहुतेक सर्व रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब होत आहे. हे टाळण्यासाठी ऑक्सिजन बससेवा सुरू करण्यात येत असून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पुरविण्यासाठी परिवहन मंडळाची बस चिक्कमंगळूर शासकीय रुग्णालयाच्या आवारात थांबविण्यात येणार आहे. बाहेरून आलेल्या रुग्णाला रुग्णालयात तात्काळ ऑक्सिजन न मिळाल्यास त्याला बसमधून ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. यासाठी बसमध्ये सर्व वैद्यकीय उपकरणे बसविण्यात आली आहेत. या बसमध्ये एकाचवेळी एकूण आठ रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था केली आहे, असेही सवदी यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटक: बुधवारीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

triratna

कर्नाटक: सोमवारी बाधित रुग्णांची संख्या घटली

Shankar_P

बीबीएमपीची पाच एकर जमीन अतिक्रमणमुक्त

Shankar_P

कर्नाटकात नवीन ४१९ बाधितांची भर

Shankar_P

राज्यात लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू नाहीच

Patil_p

कर्नाटकचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार कोरोना पॉझिटिव्ह

Shankar_P
error: Content is protected !!