तरुण भारत

कुरुंदवाड शहरात 70 हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई, 27 हजाराचा दंड वसूल

प्रतिनिधी / कुरुंदवाड

कुरुंदवाड शहरात विनाकारण दवाखान्याचे कारण सांगून रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या वाहन परवान्यांची तपासणी करून 70 हून अधिक जणांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर बागवान गल्ली येथे भाजीपाला विक्रेत्यांनी मंडप घालून पडदा लावून मांडलेला बाजार पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने हटवत आज सोमवारी दिवसभर कुरुंदवाड शहरात कारवाईचा धडाका लावला होता.

दरम्यान काही नागरिकांना पोलिसांनी अडवून वाहन परवाना आहे का ? आणि कुठे जात आहात ? अशी विचारपूस केली असता दवाखान्याला जात आहे. या कारणावरून काहींनी पोलिस व पालिका प्रशासनाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला त्यांची वाहने पोलिसांनी जप्त करून कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

येथील बागवान गल्ली रस्त्यावर मंडप घालून पडदा लावून भाजीपाला विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पालिका व पोलीस प्रशासनाला मिळाली असता या ठिकाणी छापा टाकून सदरचे मंडप काढून भाजीपाला रस्त्यावरून काढून घ्यावा अन्यथा मंडप व भाजीपाला जप्त करणार असल्याचा इशारा दिला असता व्यापाऱ्यांनी मंडप काढून घेत भाजीपाला हटवला.याठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनले होते.
शिवतीर्थ, माळभाग परिसर, सन्मित्र चौक, शिरढोण-इचलकरंजी रस्ता परिसरात पालिका व पोलीस प्रशासनाची पथके तयार करुन शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकी-चारचाकी वाहनधारकांची तपासणी करून कोणत्या कामासाठी शहरात प्रवेश करत आहेत.याची माहिती घेऊन शहरात सोडण्यात आले.यावेळी 70 हून अधिक दुचाकीस्वारांचाकडे वाहन परवाना व वाहनाला नंबर प्लेट नाही,तिबल सीट वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 27 हजाराचा दंड वसूल केला आहे.

यापुढे शहरात मिळून येणाऱ्या नागरिकांची कोरोनाची रॅपिड तपासणी करून पॉझिटिव्ह येणाऱ्यांना ताब्यात घेणार तर निगेटिव्ह येणाऱ्यांच्यात लक्षणे दिसून आल्यास 14 दिवस संस्थात्मक अलगिकरनात ठेवणार तर लक्षणे न दिसणाऱ्यावर पालिका प्रशासन फिर्यादी होऊन कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.त्याची आमलबजावणी करणार असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

बावडय़ातील त्या वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पाणंद रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात ; ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची दमछाक

Abhijeet Shinde

डोळ्यांच्या रूग्णांत वाढ, स्ट्रेनचा धोका !

Abhijeet Shinde

गुजरी कॉर्नर, वसंत मेडिकलजवळ उभारणार तात्पुरता उड्डाणपूल

Abhijeet Shinde

राज्यातील पहिली साऊंडप्रुफ शुटिंग रेंज दुधाळीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!