तरुण भारत

जोकोविचला हरवून नदाल अजिंक्य

वृत्तसंस्था/ रोम

एटीपी टूरवरील येथे झालेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रविवारी अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदालने सर्बियाच्या टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविचचा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील नदालचे हे विक्रमी दहावे विजेतेपद आहे.

Advertisements

नदाल आणि जोकोविच यांच्यातील हा अंतिम सामना दोन तास, 49 मिनिटे चालला होता. द्वितीय मानांकित नदालने जोकोविचचा 7-5, 1-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. उभय अव्वल टेनिसपटूंमधील ही 57 वी लढत चुरशीची झाली. आता आगामी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत  पुन्हा या दोन टेनिसपटूंमध्ये जेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. नदालचे हे एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतील 36 वे जेतेपद आहे. जोकोविच आणि नदाल यांच्यात यापूर्वी म्हणजे 2020 च्या पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीत गाठ पडली होती आणि नदालने सरळ सेट्समध्ये जोकोविचचा पराभव केला होता. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इतिहासात नदाल आणि जोकोविच यांनी गेल्या 17 पैकी 15 अजिंक्यपदे मिळविली आहेत. जोकोविचने इटालियन स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे. दरम्यान या उभयतामधील झालेल्या लढतीत जोकोविचने 29 वेळा तर नदालने 28 वेळा विजय मिळविला आहे. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा पॅरीसमध्ये 30 मे पासून सुरू होणार आहे. नदाल आता आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील विक्रमी 21 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. जोकोविचने 2016 साली प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती.

Related Stories

बायर्न म्युनिचच्या सुलेला कोरोनाची लागण

Patil_p

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी निश्चित होईल : बात्रा

Patil_p

महिलांची टी-20 लिग स्पर्धा प्रोत्साहन देणारी ठरेल : कौर

Patil_p

रियल काश्मीर सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत

Patil_p

फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांना १९ किलोमीटर धावून वाहिली अनोखी श्रद्धांजली

Abhijeet Shinde

जॉर्डनच्या मुष्टीयोद्धय़ाचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!