तरुण भारत

वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याचे होणार चौपदरीकरण

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे 14 कोटी 72 लाखाचा निधी

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

 सातारा लोणंद या रस्त्यावरील वाढे फाटा ते पोवई नाका या 3.40 किलोमीटर रस्त्याचे भाग्य आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे उजळणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तब्बल 14 कोटी 72 लाख 37 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

राज्य मार्ग 117 असलेल्या शिक्रापूर, जेजुरी, लोणंद, सातारा या मार्गावरील सातारा शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा ते पोवई नाका या 3.40 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी या दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा ना. गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी  ना. गडकरी यांनी त्यांच्या खात्यातून भरीव निधी मंजूर केला आहे. 

मंजूर निधीतून वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासह रस्त्याच्या कडेला आरसीसी गटर बांधणे, या रस्त्यावर असलेल्या पुलांची सुधारणा करणे, रस्त्याच्या मध्ये  दुभाजक आदी कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलं जाणार असून येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरु केले जाणार आहे. दुहेरी असलेल्या या प्रमुख रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर दळणवळणासाठी हा रास्ता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

Related Stories

दीपावली खरेदीसाठी सातारची बाजारपेठ सजली

Patil_p

हातकणंगले तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा :खतांचा पुरवठा करण्याची मागणी

Abhijeet Shinde

आता योग्य व्यक्ती होणार ‘ग्रामपंचायतीचा प्रशासक’

Patil_p

आजरा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय

Abhijeet Shinde

सातारा : शिंदे कुटुंबीयांचे जीवन झाले ‘प्रकाश’मान

Abhijeet Shinde

गडकिल्ले तटबंदीचे होणार अचूक मोजमाप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!