तरुण भारत

मोठा दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 48,211 रुग्ण कोरोनामुक्त!

  •  कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 54 लाखांचा टप्पा 

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात तब्बल 48,211 जणांनी कोरोनावर मात केली. तर 26,616 नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी 34,389 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून असून हा फरक 7 हजार 773 इतका आहे.

Advertisements


दरम्यान, कालच्या दिवशी 516 जणांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी ही संख्या 974 इतकी होती.  राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 54 लाख 05 हजार 068 वर पोहचली आहे. यातील 48 लाख 74 हजार 582 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 82 हजार 486 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.53 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 4 लाख 45 हजार 495 रुग्ण उपचार घेत आहेत. 


आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 13 लाख 38 हजार 407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 05 हजार 068 (17. 25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 33 लाख 74 हजार 258 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 28 हजार 102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

  • मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या घटली


राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातही सक्रिय रुग्ण संख्या घटत असून सद्य स्थितीत 76,160 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 32 हजार 716 वर आला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 28 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 29 हजार 428 इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 401 इतकी आहे.

Related Stories

चिंता वाढली : दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजाराच्या जवळ

Rohan_P

लॉकडाऊनच्या काळात दारूची विक्री करणार्‍या 8 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

Abhijeet Shinde

महापुराच्या सामन्यासाठी गावनिहाय आराखडा तयार : पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

कोयना पाणलोटमधील पाऊस गायब

Patil_p

भारत की इंग्लंड? फैसला आज

Patil_p

सोलापूर : कुर्डूतील ९६ वर्षीय गोदाबाईंनी केली कोरोनावर मात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!