तरुण भारत

गालजीबाग किनाऱयावरील सुरूच्या झाडांची पडझड

नदी व समुद्रादरम्यानचा वाळूचा पट्टा नामशेष

प्रतिनिधी / काणकोण

Advertisements

तौक्ते वादळाने काणकोण तालुक्यातील गालजीबाग किनाऱयाचे स्वरूपच बदलून टाकले असून एके काळी या ठिकाणी गालजीबाग नदी आणि समुद्र हा वेगवेगळा भाग होता याचे संशोधन करावे लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. गुळे ते माशेपर्यंतच्या मनोहर पर्रीकर मार्गावरील पुलाच्या बाजूने गालजीबाग नदी वाहत असून या नदीच्या पात्रासमोरच समुद्र आहे. समुद्र व नदी या दोघांमध्ये असलेला साधारणपणे 150 मीटर लांबीचा रेतीचा पट्टा या वादळाने नामशेष झाला आहे.

  या वादळात किनाऱयावरील सुरूच्या झाडांची प्रचंड प्रमाणात पडझड झालेली आहे. मुळासकट झाडे उन्मळून पडली आहेत. किनाऱयावर मोठय़ा प्रमाणात कचरा येऊन पडला आहे. यापुढे संबंधित खात्याला यासंबधी अभ्यास करावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. समुद्र आणि नदी एक झाल्यामुळे कधी तरी या ठिकाणी एका नदीचे वेगळे पात्र होते हे शोधण्याची पाळी आली आहे. याचा परिणाम म्हणून खारे पाणी आत शिरून नदीच्या बाजूला असलेल्या बागायती आणि भातशेतीवर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

कोरोना मृत्यू नोंदीत धक्कादायक वाढ

Omkar B

रस्ता रूंदीकरणाला कुस्मणवासियांचा विरोध

Amit Kulkarni

महिलांच्या आयुष्यात डोकावणारा ‘मॉरल ऑर्डर’

Abhijeet Shinde

मासळीसाठी खोल समुद्रात कोळय़ांमध्ये दादागिरी

Patil_p

आजच्या ‘इस्टर’वर कोरोना, लॉकडाऊनचे सावट

Patil_p

म्हादईच्या प्रश्नावर भाजपाकडून गोमंतकीयांची दिशाभूल

Omkar B
error: Content is protected !!