तरुण भारत

मडगावच्या न्यू मार्केटची वादळात हानी

छपराचे पत्रे उडाले, पावसाचे पाणी आंत जाऊन काही व्यापाऱयांचा माल खराब

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

रविवारी आलेल्या चक्रीवादळात मडगावातील न्यू मार्केटमधील छपराचे चांगलेच नुकसान झाले असून छपराचे कित्येक प्लास्टिक पत्रे उडून गेल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी आंत येऊन व्यापाऱयांचे साहित्य खराब झाल्याच्या कैफियती व्यापाऱयांनी मांडल्या आहेत.

न्यू मार्केट बाजारपेठ कर्फ्यूमुळे बंद ठेवण्यात आलेली असून रविवारच्या वादळात छपराचे पत्रे उडाल्याने काही व्यापाऱयांचा माल खराब झाला असला, तरी पाऊस यापुढे पडण्याची शक्मयता असल्याने पालिकेने व्यापाऱयांना अतिरिक्त नुकसान होऊ नये म्हणून सोमवारी सकाळी मार्केटच्या गेट खोलून साहित्य बाहेर काढू दिल्याची माहिती येथील फळ-भाजीविपेता प्रशांत मोर्ये यांनी दिली.

आणखी आठवडाभर मार्केट बंद राहणार असल्याने पालिकेने त्वरित आवश्यक डागडुजी करण्यासाठी काम हाती घेण्याची मागणी व्यापाऱयांनी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे केली आहे. मार्केट बंद असल्याने पालिकेला सुलभपणे व अधिक गतीने काम करणे शक्मय असल्याचे व्यापाऱयांनी नजरेस आणून दिले. स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्या नजरेस काही व्यापाऱयांनी ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये फेरफटका मारून पाहणी केली व पालिकेने त्वरित आवश्यक कृती करावी, अशी सूचना केली.

Related Stories

‘तो’ बनवतो 15 हजारहून अधिक आकाशकंदीलांचे साचे

Amit Kulkarni

खाणबंदीवर तोडग्याची सरकारला आशा

Patil_p

अपघातील मयताच्या कुटुंबाला विमा नुकसान भरपाई द्यावी

Amit Kulkarni

माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची प्रकृती बिघडली

Patil_p

गोमंतक भंडारी समाजाच्या हळदोणे मतदारसंघाच्या ग्रामसमित्या

Amit Kulkarni

शिवसेनेतर्फे लता गांवकर यांची बदली मागे घेण्यासाठी निवेदन

tarunbharat
error: Content is protected !!