तरुण भारत

विहिंप-बजरंग दलतर्फे दोन रुग्णवाहिका जनसेवेत रुजू

प्रतिनिधी /बेळगाव

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा शाखेतर्फे दोन रुग्णवाहिका जनसेवेत रुजू करण्यात आल्या आहेत. हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी व आर्ष विद्या केंद्राचे स्वामी चित्प्रकाशानंद यांच्या हस्ते नुकत्याच या रुग्णवाहिका जनसेवेसाठी रुजू करण्यात आल्या. यासाठी रोटरी क्लब बेळगाव दक्षिण व गुजरात समाजाचे सहकार्य लाभले.

Advertisements

बुडाचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनीसुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या बेळगाव शाखेला 1 लाख रुपयांची मदत दिली आहे. यावेळी बोलताना चंद्रशेखर स्वामी यांनी विहिंपची जनसेवा ही अत्यंत स्वागतार्ह आहे. जाती-भेदापलीकडे जाऊन या संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या वातावरणात अग्निहोत्र विधी व धन्वंतरी पूजा उपयुक्त ठरेल, त्यासाठीचे साहित्य आपण देऊ, असे सांगितले. स्वामी चित्प्रकाशानंद यांनी आजच्या काळात 24 तास जनसेवेसाठी कार्यरत असणे विशेष उल्लेखनिय असून या संस्थांना देणगीदारांनी साहाय्य करावे, असे सांगितले. याप्रसंगी आरएसएसचे प्रांत प्रचारक नरेंद्र, विहिंपचे प्रांत सहकोषाध्यक्ष कृष्णा भट्ट यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Related Stories

सुटेभाग जोडून तयार केलेल्या रिक्षाची विक्री

Omkar B

पाऊस, ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत

Patil_p

झारखंडहून परतलेल्या वृद्धाला कोरोना

Patil_p

सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांकडे पाठपुरावा

Omkar B

गुंजीत अवजड वाहनांची वाहतूक रोखली

Amit Kulkarni

कारवार येथील आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!