तरुण भारत

कर्नाटकात सोमवारी ३८ हजाराहून अधिक संक्रमितांची नोंद

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. दरम्यान राज्यात रविवारी कोविड पॉझिटिव्हिटी दर २७ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानंतर काही अंशी दिलासा मिळाला होते. परंतु, दुसर्‍याच दिवशी सोमवारी सकारात्मकतेचे प्रमाण वाढून ३९.७० टक्क्यांवर गेले. पॉझिटिव्ह दर वाढल्याने पुन्हा प्रशासनाची चिंता वाढली. याआधी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण इतके वाढले नव्हते. राज्यातील मृत्यूचे प्रमाणही १.२३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. राज्यात तासात एक लाखाहून कमी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात सोमवारी नवीन संक्रमित रुग्णांची संख्या ४० हजारांच्या जवळपास पोहोचली.

गेल्या २४ तासात राज्यात कोविडचे ३८,६०३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३४,६३५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २२,४२,०६५ वर पोहोचली आहे. तर १६,१६,०९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ६,०३,६३९ इतकी आहे. तर कोरोनामुळे एकूण २२,३१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सोमवारी ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७२.०८ टक्के आहे आणि मृत्यू दर ०.९९ टक्के आहे.

Advertisements

Related Stories

पदवी महाविद्यालये आजपासून गजबजणार

Patil_p

कर्नाटक: दुसऱ्या लाटेत २८ डॉक्टरांनी गमावला जीव : आयएमए

Abhijeet Shinde

कर्नाटक: महिला दिनानिमित्त गुलाबी लसीकरण बूथ सुरु

Abhijeet Shinde

कर्नाटक : राज्यात शुक्रवारी ९७० पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Abhijeet Shinde

बेंगळूर हिंसाचार: निष्पापांना दोषी ठरवले जाऊ नये: सिद्धरामय्या

Abhijeet Shinde

बेंगळूर महापालिकेच्या वॉर्डांची संख्या 243 वर

Amit Kulkarni
error: Content is protected !!