तरुण भारत

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

केंद्र सरकारकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

प्रतिनिधी / मुंबई

Advertisements

खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली असून त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय कृषीमंत्री मा. नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली.

चंद्रकांतदादा पाटील यांनी या मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोना महासाथ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत व योजना सुरू केल्या आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही पत्र पाठविले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

Related Stories

खुशखबर : एस.टी. कर्मचा-यांचे वेतन आज जमा होणार

triratna

करवीर तालुक्यात ६६ गावात होणार खुल्या प्रवर्गातील सरपंच

triratna

उत्कृष्ट सेवेकरीता महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदके’

Rohan_P

व्यापाऱयांनी मांडली जिल्हाधिकाऱयांकडे कैफियत

Patil_p

अलगीकरण कक्षापर्यंत पोहोचले राजकारण

triratna

सोलापूर जिल्ह्यात सहा हजार बाधित रुग्ण ; 2,810 जण ठणठणीत

triratna
error: Content is protected !!