तरुण भारत

”काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा खतरनाक”


मुंबई \ ऑनलाईन टीम

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत संकटातही काँग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केल्याचा आरोप केला. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील याच मुद्दयावरून काँग्रेसवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी दोन ट्वीट केली आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, असा आरोप अतुल भातखळकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, भारताचा नंबर 1 शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?, असा सवाल त्यांनी केला आहे.

Advertisements

Related Stories

कर्तारपूर कॉरिडॉर उद्यापासून सुरू करण्यासाठी पाकचा भारताकडे प्रस्ताव

datta jadhav

सेक्स रॅकेटप्रकरणी बिगबॉस फेमसह मॉडेल अटकेत

prashant_c

दिलासादायक : मालेगावात एका दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

पाकिस्तानमुळे चीनचे संपूर्ण शहर क्वारंटाइन

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 264 पोलिसांना कोरोनाची बाधा; 3 मृत्यू

Rohan_P

राष्ट्रवादी पॅनेलबाबत पवार साहेब घेणार बैठक

Patil_p
error: Content is protected !!