तरुण भारत

कोरोना काळात औषधांचा काळाबाजार निदर्शनास आल्यास कारवाई करणार

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेची भूमिका : अध्यक्ष विजय पाटील

प्रितनिधी / विटा

Advertisements

महाराष्ट्रात इंजेक्शन, औषधे आणि इतर फार्मसी संबधित साहित्याची चोरी, काळाबाजार, बनावट निर्मितीसारख्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये काही पंजीकृत औषध व्यावसायिकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. भविष्यात देखील अशी प्रकरणे निदर्शनास आल्यास परिषदेच्यावतीने कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे.

याबाबत विजय पाटील यांनी दिलेली माहिती अशी, सद्यस्थितीत कोविड-१९ ची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यासाठी वापरण्यात येणारी औषधे, इंजेक्शन आणि इतर फार्मसी संबंधित साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या अनुषंगाने सदर औषधे, इंजेक्शन आणि इतर फार्मसी संबंधित साहित्याची चोरी, काळाबाजार, बनावट निर्मिती यासारख्या जनहितास बाधा आणणार्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही फार्मासिस्टचा अत्यंत मोजक्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग निदर्शनास येत आहे.

त्यांच्यावर औषध व्यवसाय अधिनियम १९४८ च्या कलम ३६ आणि फार्मासी प्रॅक्टिस रेग्यूलेशन २०१५ च्या तरतूदीनुसार कडक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. काही मूठभर फार्मासिस्टच्या दुष्कृत्यामुळे फार्मासिस्टची जनमानसातील प्रितमा मलीन होत आहे. याची परिषदेतर्फे गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे. भविष्यातही अशी प्रकरणे समोर आल्यास कडक कारवाई करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेने घेतली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Related Stories

रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या

Abhijeet Shinde

स्वीकृतसाठी भाजपमध्ये चढाओढ सुरू

Patil_p

भांडुपच्या मॉलमधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू

Rohan_P

सांगली जिल्ह्यातील अनेक गावांशी संपर्क तुटला!

Abhijeet Shinde

मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी

Rohan_P

महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढतोय, पंतप्रधानांकडून कौतुक!

Rohan_P
error: Content is protected !!