तरुण भारत

खजिन्याच्या शोधात 80 फुटांचे भुयार खणले

तथाकथित गुरुजीच्या बतावणीला भुलला

खजिना शोधणे सोपे काम नाही, तरीही जगभरात लोक जमिनीत गाडण्यात आलेला एखादा खजिना शोधण्याच्या प्रयत्नात असतात. अनेकांच्या हाती खजिना लागतो देखील, मग अशा लोकांची कहाणी इतरांना असाच अमूल्य खजिना शोधण्यासाठी प्रोत्साहित करते. तिरुपतीच्या मंगलम भागता रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी एका 40 वर्षीय ट्रेझर हंटरला (खजिना शोधणारा) त्याच्या 6 मजुरांसह अटक केली आहे. तो अवैध पद्धतीने प्राचीन खजिना शोधण्यासाठी शेषचलमच्या पर्वतावर भुयार खणत होता.

Advertisements

छुप्या खजिन्याच्या शोधात ट्रेझर हंटर मंकू नायडूने मजुरांच्या मदतीने बीटीआर कॉलनीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील जंगलातील शेषचलमच्या पर्वतावर 80 फूट लांबीचे भुयार खणले होते. हे काम तो मागील एक वर्षापासून करत होता. खजिन्यासाठी नायडूला जमिनीत सुमारे 120 फूट लांबीचे खोदकाम करण्यास सांगण्यात आले होते.

रविवारी रात्री काही अज्ञात लोक पर्वताच्या दिशेने जात असल्याचे पाहून संशय आल्याने लोकांनी पोलिसांना कळविले हेते. घटनास्थळी त्वरित पोहोचून पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे. या भुयाराची पाहणी करत अनेक पुरावे जमविल्याचे पोलीस निरीक्षकाने सांगितले आहे.

गुरुजीची बतावणी

नायडू 2014 मध्ये अनाकापल्ले येथून तिरुपती येथे रहायला आला होता. येथे तो पेंटिंगचे काम करत होता. त्याची भेट स्वयंभू गुरुजी रमैया स्वामीशी झाली होती. या गुरुजीनेच त्याला पर्वतामध्ये खजिला लपलेला असल्याचे सांगितले होते. नायडूने या बतावणीवर विश्वास ठेवून मागील वर्षीच गुरुजीसोबत मिळून स्फोटकांद्वारे भुयार खणण्यास प्रारंभ केला होता. पण 6 महिन्यांपूर्वी गुरुजीचा मृत्यू झाला होता. पण नायडूने स्वतःचे शोधकार्य सुरूच ठेवले होते.

Related Stories

लोकसभेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

prashant_c

सैन्यासोबत मेक इन इंडियाला बळ

Patil_p

8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर हरित कर?

Patil_p

क्रिप्टोकरन्सीवर विधेयक सादर करण्याची तयारी

Patil_p

कायदामंत्र्यांनाच ट्विटरचा दणका

Amit Kulkarni

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!