तरुण भारत

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

चीनमध्ये लिंग गुणोत्तराची समस्या, अनेक देशांची लोकसंख्या याहून कमी

जगात सर्वाधिक सुमारे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित आहेत. ही संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. अलिकडेच झालेल्या जनगणनेतून ही माहिती समोर आली आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनुसार चीनमध्ये दीर्घकाळापर्यंत मुलांनाच प्राथमिकता देण्यात येत राहिली आहे.

Advertisements

पण यंदा मुलींच्या जन्मात किंचित वाढ झाली आहे. तरीही लिंग गुणोत्तरातील फरकावर तोडगा निघण्याची शक्यता नाही. मागील वर्षी चीनमध्ये 1.2 कोटी बाळांचा जन्म झाला. यात प्रति 100 मुलींमागे मुलांची संख्या 111.3 इतकी आहे. 2010 मध्ये हे प्रमाण 100 मुलींमागे 118.1 मुलगे इतके होते.

विवाहयोग्य वयात पोहोचल्यावर युवकांसाठी वधूंची कमतरता भासत आहे. मागील वर्षी 1.2 कोटी शिशूंनी जन्म घेतला आहे. पण जेव्हा ती मोठी होतील, तेव्हा 6 लाख मुलांना विवाहासाठी वधू मिळणार नसल्याचे उद्गार प्राध्यापक बीजोर्न एल्परमॅन यांनी काढले आहेत.

Related Stories

संघटनेची अनुमती

Patil_p

‘मिस वर्ल्ड 2021’चा ग्रँड फिनाले रद्द

Patil_p

जगभरात 3 कोटींहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

कर्नाळमध्ये मजूर, अमेरिकेत ‘डाटा सायंटिस्ट’

Patil_p

एलईटी, जैश अन् पाक सैन्यामुळेच सरशी

Patil_p

पाकिस्तानातील मशिदी कोरोन प्रसाराची केंद्रे

Patil_p
error: Content is protected !!