तरुण भारत

शमा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनतर्फे अंजुमन ए इस्लाम संस्थेला रुग्णवाहिका भेट

बेळगाव /प्रतिनिधी

अंजुमन ए इस्लाम ही संस्था कोरोनाच्या काळात जे काम करत आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. जात, भेद विसरून फक्त माणुसकीच्या नात्याने कोणताही स्वार्थ न बाळगता या संस्थेने आपले कार्य निरंतर चालू ठेवले आहे. त्यांच्या या कार्यात आपलाही सहभाग असावा या हेतूने शमा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनने अंजुमन ए इस्लाम या संस्थेला रुग्णवाहिका भेट दिली आहे. 

Advertisements

कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात वाहने रस्त्यावर फिरणे बंद करण्यात आल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहचविण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या जाणून घेऊन शमा एज्युकेशन अँड वेल्फेअर फौंडेशनने रुग्णवाहिका समाजसेवेसाठी देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

 यावेळी कोर्ट कंपाउंडजवळील अंजुमन ए इस्लामच्या परिसरात संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी राजू सेठ यांनी शमा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले आणि सदर रुग्णवाहिका बेळगावकरांच्या सेवेत सदैव हजर असेल, असा विश्वास व्यक्त केला.    याप्रसंगी शमा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाऊंडेशनचे अख्तर सनदी, अख्तर फनेमन, फयाज हुदलीकर, मजर दलायत, अंजुमन ए इस्लाम संस्थेचे राजू शेठ,  समिउल्ला माडीवाले, अमान सेठ, फहीम नाईकवाडी, बाबुलाल मुजावर, राजा मुल्ला  आदी उपस्थित होते.

Related Stories

दुचाकीची पिकअप वाहनास धडक : 2 ठार

Patil_p

समितीच्या सिंहाला दिल्लीत पाठवून देण्याचा निर्धार

Amit Kulkarni

सेक्टर अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेटबाबत सूचना

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये लवकरच होणार ऑनलाईन मद्य विक्री

Abhijeet Shinde

सन्नीधी चषक स्पर्धेत के. आर. शेट्टी संघ विजेता

Amit Kulkarni

माजी सैनिक संघटना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची बैठक

Amit Kulkarni
error: Content is protected !!