तरुण भारत

कोल्हापूर शहरातील दूध विक्री उद्यापासून बंद

दूध वितरक असोसिएशनचा निर्णय, पोलीस प्रशासनाची अरेरावी कारवाई कायम

कोल्हापूर/प्रतिनिधी

शहरात जागेवरून केवळ दूध विक्री करूनही पोलीस प्रशासनाकडून दूध वितरक दुकानदारांना अरेरावी केली जात आहे. त्याचबरोबर दंडात्मक कारवाई करत वितरकांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून गेल्या वर्षभरापासून कोरोना काळात दूध वितरणाची सेवा देणाऱ्या वितरकांवर पोलीस जर अशा पद्धतीने कारवाई करणार असतील तर उद्यापासून शहरातील दूध विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय दूध वितरक असोसिएशनने घेतला आहे.

Advertisements

कोल्हापूर : वितरकांचा दूध विक्री बंदचा निर्णय मागे

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात आठ दिवसांयचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत दूध व भाजीपाला जागेवर बसून विक्री न करता तो घरपोच विक्री करावा, अशी सूचना प्रशासनाने केली होती. मात्र दूध पूर्णपणे घरपोच विक्री करणे शक्य नसल्याने, जागेवरून केवळ दूध विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी वितरकांनी गोकुळ प्रशासनाकडे केली होती.
वितरकांच्या मागणीसंदर्भात गोकुळने जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली होती. यामध्ये जागेवरून दूध विक्रीस प्रशासन सहमत असल्याचे गोकुळ प्रशासनाकडून वितरकांना सांगण्यात आले होते. मात्र तरीही पोलीस प्रशासनाकडून जागेवरून दूध विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. कारवाई सोबतच वितरकांवर पोलिसांकडून उद्धट भाषाही वापरली जात आहे. त्यामुळे दूध विक्रीतून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा दंड अधिक होत असल्याने तसेच पोलीस प्रशासनाच्या अरेरावी मुळे होणाऱ्या मनस्तापामुळे शहरातील दूध वितरकांनी उद्यापासून दूध विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

घातक फटाक्यांसाठी अधिकारी जबाबदार ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Abhijeet Shinde

उर्मिला मातोंडकरांच्या पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पंकजा म्हणाल्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात सहा महिन्यांनंतर कोरोना मृत्यू शुन्यावर

Abhijeet Shinde

प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका; मोदींचा मंत्र्यांना सल्ला

Abhijeet Shinde

गगनबावडा तालुक्यात पावसाने मोठे नुकसान

Abhijeet Shinde

ग्रामीण भागातील पोलीस पाटील, कोतवाल विमासुरक्षा व सुरक्षा किट पासून वंचित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!