तरुण भारत

”महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर त्यामुळे नरेंद्र मोदी तिथला दौरा करत असतील”


मुंबई \ ऑनलाईन टीम

तौक्ते चक्रीवादळाने गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना जोरदार फटका बसला आहे. या वादाळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील. अशा ठिकाणी जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतील, त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत, असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला.

चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यांच्या संजय राऊत यांनी घेतला समाचार

यावेळी संजय राऊत यांना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या देशात अगदी उद्या निवडणूक झाली तरी मोदी सरकार 400 जागा जिंकेल या वक्तव्याविषयी विचारले. यावर संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील असतील किंवा भाजप नेते असतील त्यांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडला आहे, याचं मला अभिनंदन करू वाटतं. त्यामुळे भाजपला 400 काय अगदी 500 जागाही मिळू शकतात. एवढंच काय ते जगभरातील पार्लामेंटसच्या सर्व जागा जिंकू शकतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा कोरोना काळात लोकांचं भविष्य घडवणे जास्त गरजेचे आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

Related Stories

कोल्हापुरात आणखी 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

भुदरगड मध्ये मराठा समाजामार्फत पाटगाव ते आदमापूर संघर्ष यात्रा

Abhijeet Shinde

दिल्ली : मागील 6 दिवसात एक लाखपेक्षा अधिक कोरोना चाचण्या; संक्रमण दरात 10 टक्के घट

Rohan_P

शुभेच्छांचा वर्षाव अन् जीवनचरित्रास उजाळा

Abhijeet Shinde

लॉकडाऊममध्ये शुक्रवार पेठेत होतेय वृक्ष तोड

Patil_p

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

Rohan_P
error: Content is protected !!