तरुण भारत

सांगली : चंडी तोळबळवाडी येथे तीस रुपयाच्या कारणावरून तरुणाचा खून

वार्ताहर / वळसंग

जत तालुक्यातील मुचंडी तोळबळवाडी येथे तीस रुपये मागितल्याच्या कारणावरून गळा आवळून व लाथाबुक्क्यांनी छतीवर गंभीर जखम करून एका तरुणाचा मित्रानेच खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण शामू मलमे (वय.२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मुचंडी ( तोळबळवाडी) कन्नड शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद मयतचे वडील शामू गुंडा मलमे (वय ५८) यांनी जत पोलिसात दिली आहे.

खून केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुचंडी पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तोळबोळवाडी येथे अरुण मलमे व रमेश पाटोळे हे शेजारी शेजारी राहणारे दोघे मित्र होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित रमेश हा अरुणला तीस रुपये देण्यासाठी गेला होता .या वेळी दोघांचे येथील कन्नड शाळेजवळ पैशातून भांडण झाले. यावेळी रमेशने अरुणचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून ढकलून दिले व खाली पडल्यावर रमेशने छतीवर बसून अरुणला जखमी केले . यात अरुण हा जागीच मयत झाला, ही माहिती अरुण याच्या चुलत्यानी त्याच्या वडिलांना दिली, वडील व नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत अरुण हा मृत झाला होता.

दरम्यान, खून केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहेत, घटनास्थळी उपविभागीय पोलीस निरीक्षक रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते आदींनी भेट दिली. तपास सपोनि गोपाळ भोसले करत आहेत, आरोपीच्या शोधासाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : कचरावेचक महिलांचे कामाच्या ठेक्यासाठी एस एम एस आंदोलन

triratna

कोरोनाचा आठवा बळी, नवे १६ रूग्ण

triratna

सांगली : ‘भाषा सुधारा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ’

triratna

जतमध्ये एक हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

triratna

शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी सांगलीत निदर्शने

triratna

नेर्ली येथे मुंबईहून आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

triratna
error: Content is protected !!