तरुण भारत

सोलापूर शहरात 59 तर ग्रामीण भागात 2099 नवे कोरोना रुग्ण

एकाच दिवशी जिल्ह्यात 31 जणांचा मृत्यू 

प्रतिनिधी /  सोलापूर

Advertisements

सोलापूर  शहरात बुधवारी 59 तर ग्रामीण भागात 2099 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 31 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज नवे कोरोनाबाधित 2099 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 23 रुग्णांचा मृत्यू तर 1774  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 2099  पैकी 1243 पुरुष, 856  स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 2315 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 11 हजार 273   कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 17 हजार 004 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली.  जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 8688 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते.

त्यातील  6589 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर  2099 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2215 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 91 हजार 954 जण बरे होऊन घरी गेली आहेत.  सोलापुर शहरात  नव्याने 59 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 38  रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने  8 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

सोलापुर शहरात  2436 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 59 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2377 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 59  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 35 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27  हजार 688 झाली आहे.

Related Stories

बार्शीत भटक्या कुत्र्यांनी तोडले बालकाचे लचके

triratna

सोलापूर ग्रामीणमध्ये १७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

triratna

सोलापुरात आणखी पाच नवीन कोरोना रुग्ण; संख्या 30 वर

triratna

पुणे : मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली पेटी दाखल

prashant_c

पंकजा मुंडेंचे आंदोलन भाजपकडून ‘हायजॅक’

prashant_c

सोलापुरात जुगार अड्ड्यावर छापा ४० जणांवर कारवाई

triratna
error: Content is protected !!