तरुण भारत

लॉकडाऊननंतर कोल्हापुरातूनच मराठय़ांचा पुन्हा एल्गार

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा इशारा : पश्चिम महाराष्ट्रातील मराठा संघटनांशी संवाद साधरणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील मराठा समाजाला गृहित धरून व्यवहार करत आहे. मराठा युवक, युवतींच्या व्यथा वेदनांशी या सरकारला ना कोणेतेही देणे घेणे आहे ना भीती आहे, अशा स्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण प्रसंगी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून संघर्ष करणार आहोत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. लॉकडाऊननंतर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून मराठय़ांच्या आंदोलनाची ठिणगी पडेल. त्यानंतर त्याचा वणवा राज्यभर पसरेल, मराठय़ांचा एल्गार ठाकरे सरकार दिसेल, अशा इशाराही घाटगे यांनी यावेळी दिला.

घाटगे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणविषयक सुनावणीवेळी राज्य सरकारने हलगर्जीपणा दाखवला. वकील हजर न ठेवणे, सशक्त युक्तिवाद न करणे, मराठा समाजाची न्याय्य बाजू व्यवस्थितपणे न मांडणे आदी गोष्टी घडल्या. त्यामुळे हातातोंडाशी आलेला मराठा आरक्षण कायदा रद्द झाला.

आरक्षण कायदा रद्द झाल्याने मराठा युवक, युवतींमध्ये प्रचंड रोष आहे. त्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. मराठा समाज आणि त्यातील युवक युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे लढावे लागेल. त्यासाठी आता मराठा समाजातील प्रत्येकाने एकत्रित येण्याची गरज आहे. एकजुटीसाठी माझी कुणाकडेही जाण्याची तयारी आहे, असेही घाटगे यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा संघटनांशी संवाद साधणार

सामान्य मराठा म्हणून आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विविध संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र करुन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. लॉकडाऊन नंतर राज्यातील मराठा समाजाला दिशा देणाऱया आंदोलनाची ठिणगी आता कोल्हापुरातूनच पडेल. ती ठिणगी राज्यात मराठा आरक्षणचा लढा तीव्र करेल, असा इशारा घाटगे यांनी दिला.

Advertisements

केंद्राकडे बोट दाखवून राजकारण

मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने फेरया†चका दाखल केली. पण राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करणे सोडाच पण राज्य मागास वर्ग आयोग सुद्धा स्थापन केलेला नाही. आरक्षण मिळेपर्यंत सवलतीही जाहीर केलेल्या नाहीत. केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार राजकारण करत आहे, अशी टीका घाटगे यांनी केली.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसात दुसऱ्यांदा नवे रूग्ण शेकड्यात

triratna

“ठाकरे सरकारच्या माध्यमातून हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू”

triratna

जम्मू : पाकिस्तानकडून गोळीबार सुरू; दोन जवान शहीद तर चारजण जखमी

Rohan_P

उत्तर प्रदेशात यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात; 7 जण ठार तर 32 जखमी

Rohan_P

ममतांच्या भाच्याचे पक्षात महत्त्व वाढले

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी बोलविली १८ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक

triratna
error: Content is protected !!