तरुण भारत

सुनील चेत्रीचे पुनरागमन, भारतीय संघ दोहास रवाना

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील चेत्री कोरोना बाधेतून पूर्ण बरा झाला असून त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या नेतृत्वाखालील 28 सदस्यीय भारतीय संघाने बुधवारी सायंकाळी दोहाकडे प्रयाण केले. तेथे हा संघ 2022 फिफा विश्वचषक आणि 2023 आशियाई चषक पात्रतेचे सामने खेळणार आहे.

Advertisements

यजमान कतारविरुद्ध 3 जून रोजी भारताचा पहिला सामना होणार असून त्याआधी दोहातील बायोबबलमध्ये संघाचे सराव शिबिर होणार आहे. गेल्या मार्चमध्ये ओमान व संयुक्त अरब अमिरातविरुद्धचे दोन आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे सामने हुकल्यानंतर सुनील चेत्री आगामी सामन्यातील पुनरागमन करणार आहे. कोव्हिड 19 च्या प्रोटोकॉलनुसार संघातील सर्व खेळाडू व स्टाफ मेंबर्सकडे 48 तासाआधी काढलेला आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. दोहाकडे प्रयाण करण्यापूर्वी भारतीय संघ 15 मे पासून दिल्लीत क्वारंटाईनमध्ये राहिला होता.

संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले की, ‘पात्रतेचे सामने खेळण्यासाठी परिस्थिती आदर्श नसली तरी सराव शिबिरात ब्ल्यू टायगर्स खेळाडू कसून सराव करणार आहेत. कोरोना महामारीच्या कारणास्तव मेच्या सुरुवातीस कोलकात्यात होणारे राष्ट्रीय सराव शिबिर रद्द करण्यात आले होते. या महामारीने दुबईमध्ये होणारा मित्रत्वाचा सामनाही आम्ही गमविला आहे,’ असेही ते म्हणाले.

भारतीय फुटबॉल संघ ः गोलरक्षक-गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, धीरज सिंग. बचावफळी-प्रीतम कोटल, राहुल भेके, नरेंदर गेहलोत, चिंगलेनसाना सिंग, संदेश झिंगन, आदिल खान, आकाश मिश्रा, सुभाशिष बोस. मध्यफळी-उदांता सिंग, ब्रँडन फर्नांडीस, लिस्टन कुलासो, रॉवलिन बोर्जेस, ग्लॅन मार्टिन्स, अनिरुद्ध थापा, प्रणॉय हलदर, सुरेश सिंग, लालेंगमाविया राल्ते, अब्दुल सहल, यासिर मोहम्मद, लालियानझुआला छांगटे, बिपिन सिंग, आशिक कुरुनियन. आघाडी फळी-इशान पंडिता, सुनील चेत्री, मनविर सिंग.

भारताचे सामने

जून 3- भारत वि. कतार (रात्री 10.30 वाजता)

जून 7-भारत वि. बांगलादेश (सायं. 7.30 वाजता)

जून 15-भारत वि. अफगाणिस्तान (सायं. 7.30 वाजता).

Related Stories

दिल्ली क्रिकेट संघटनेचा कारभार हंगामी समितीकडे

Patil_p

विजयासह विंडीजची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत बरोबरी

Patil_p

वेतन मर्यादा हटवण्याचा एटीकेचा प्रस्ताव

Patil_p

विराट, रोहित, बुमराह अव्वल श्रेणीत कायम

Patil_p

सुशीलकुमारविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट

Patil_p

बोरुसिया माँचेनग्लाडबाचचा मोठा विजय

Patil_p
error: Content is protected !!